BMC च्या नायर हॉस्पिटलमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | BMC bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणार्‍या टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालयात 7 डेटा एन्ट्री ऑपरेटर पदे भरण्यात येत  आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : 

(अ)

1. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
आणि
2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य / विज्ञान /कला/ विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
(ब) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
(क) उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
(ड)
1. उमेदवाराजवळ एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र. मातंस 2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 मध्ये नमूद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तर्णी केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
(इ) डेटा एन्ट्री ऑपरेटर कामकाजाचा अनभव असल्यास त्यांना प्राध्यान्य दिले जाईल

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी करुन निवड यादी प्रसारीत करण्यात येईल व निवड यादीतील उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : उमेदवारोचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये

अर्ज फी : NA

वेतन : निश्चित वेतन दरमहा रु. 18000/- निश्चित (कोणताही भत्ता अनुज्ञेय नाही)

अर्ज कसा भरावा :  

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे,
  • विहित नमुन्यात सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज, अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटवून अर्ज बा. य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008 या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जसोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड/ पासपोर्ट / वाहनचालक परवाना / वीज देयक [बिल] / दुरध्वनी देयक [बिल])
  4. ओळख पुरावा (आधार कार्ड/ वाहनचालक परवाना / पारपत्र [पासपोर्ट ] / मतदान ओळखपत्र)
  5. माध्यमिक शालांत परिक्षेची गुणपत्रिका (एसएससी)
  6. उच्च माध्यामिक परिक्षेची गुणपत्रिका (एचएससी)
  7. पदवी परिक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  8. इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
  9. एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  10. दोन पासपोर्ट आकाराची अलिकडील काढलेली छायाचित्रे शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेली इतर कागदपत्रे.
  11. अनुभव प्रमाणपत्र

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/3/2024

इतर सूचना : 

  1. सादर निवड ही कंत्राटी पद्धतीने असेल. कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर पद नियमित स्वरुपातील नसून नियमित उमेदवार भरेपर्यत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राट कालावधी करिता असेल.
  2. रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार नेमणूका करण्यात येतील.
  3. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यासापेक्ष आहे.
  4. पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा.
  5. उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता / व्यवसायिक अर्हता / संबंधित गुणपत्रिका साक्षांकितछायाप्रत जोडावी.
  6. निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 500/- च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
  7. कामकाजातील त्रुटी, कर्तव्यावरील अनुपस्थिती तसेच वागणूक आणि कार्यालयाकडे सादर केलेल्या करारनामाचा भंग केल्यास अथवा पालन न केल्यास कंत्राटी उमेदवारांची सेवा त्याचक्षणी तात्काळ समाप्त करण्यात येईल.
  8. कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा-यांना नियमित पदांकरिता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत. तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल.
  9. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या उमेदवाराची सेवा आवश्यकता वाटल्यास कधीही तसेच कुठलीही पूर्व सूचना न देता समाप्त करण्यात येईल
  10. कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी नियमित नियुक्तीसाठी भविष्यात हक्क सांगता येणार नाही. नियमित नियुक्तीच्या वेळी कंत्राटी तत्वावर काम केलेल्याचा विचार केला जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.