राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राच्या नियामक व प्रवर्तन प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची ( महारेरा ) स्थापना केली. महारेरा मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
उच्च श्रेणी लघुलेखक | 2 |
लघुटंकलेखक | 1 |
अधिक्षक | 2 |
सहायक अधिक्षक | 2 |
वरिष्ठ लिपीक | 9 |
अभिलेखापाल | 1 |
तांत्रिक सहायक | 1 |
कनिष्ठ लिपीक | 4 |
लिपीक | 2 |
शिपाई | 13 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उच्च श्रेणी लघुलेखक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. २. इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. 3. MS-CIT प्रमाणपत्र. ४. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक. |
लघुटंकलेखक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. २. इंग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. 3. MS-CIT प्रमाणपत्र. ४. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक. |
अधिक्षक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल.) २. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधिक्षक किंवा सहायक अधिक्षक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक. |
सहायक अधिक्षक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. २. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहायक अधिक्षक किंवा वरिष्ठ लिपीक पदाना किमान ०३ ते ०५ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव आवश्यक. |
वरिष्ठ लिपीक | १ मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. २ न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील येथील ०३ ते ०५ वर्षाचा वरिष्ठ लिपीक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव. |
अभिलेखापाल | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. २. न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव. |
तांत्रिक सहायक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची विज्ञान (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी. २. न्यायालय किंवा न्यायाधीकरणाचा ०१ वर्षांचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
कनिष्ठ लिपीक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे. २. मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. ३. MS-CIT प्रमाणपत्र. ४. न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील कनिष्ठ लिपीक पदाना किमान ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव. |
लिपीक | १. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे. २. मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. ३. MS-CIT प्रमाणपत्र, ४. न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील लिपीक पदाचा ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव. |
शिपाई | १. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उर्तीण असने आवश्यक आहे. २. न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी ०६ महिण्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव. |
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
उच्च श्रेणी लघुलेखक | 41800/- |
लघुटंकलेखक | 34760/- |
अधिक्षक | 38600/- |
सहायक अधिक्षक | 34760/- |
वरिष्ठ लिपीक | 34760/- |
अभिलेखापाल | 32800/- |
तांत्रिक सहायक | 35000/- |
कनिष्ठ लिपीक | 32800/- |
लिपीक | 32800/- |
शिपाई | 25000/- |
अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
पत्ता :
प्रबंधक,
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण,
पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड,
काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 26/03/2024
इतर सूचना :
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक
याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज
बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरीअर किंवा
वैयक्तिक दिः २६ मार्च २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतिल. - अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरात लिहावे.
- निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्यान्या कालावधीकरिता असेल ननंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे २ वेळा ११-११ महिण्याची पूनःनियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
- महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.