10 वी 12 वी पास नोकरी : महावितरणकडून विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा. | Vidyut sahyak bharti

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्यात येत आहेत.

“विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.

एकूण पदांची संख्या खालील प्रमाणे .

10 वी 12 वी पास नोकरी : महावितरणकडून विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा. | Vidyut sahyak bharti

शैक्षणिक पात्रता : 

  • 12 वी पास तसेच ,
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

निवड प्रक्रिया :

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारीत राहील. परीक्षेचे माध्यम मराठी /इंग्रजी राहील. ऑन लाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता बोलविण्यात येईल.

ऑन लाईन परीक्षा ही सदर पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी ( General Aptitude) यावर आधारीत राहील. ऑन लाईन परीक्षेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-

10 वी 12 वी पास नोकरी : महावितरणकडून विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा. | Vidyut sahyak bharti

नोकरीचे ठिकाण : आवश्यतेनुसार महाराष्ट्रात कुठेही

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

अर्ज फी : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 250 + GST
  • आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी : 125 + GST

वेतन :

  • अ) प्रथम वर्ष – एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • ब) द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • क) तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये १७,०००/-

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे,
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (valid) स्वत:चा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑन लाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणी केलेला सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैध / कार्यरत राहणे आवश्यक आहे.ऑन लाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.
  • अर्जामध्ये नमूद केलेली विवरणे / बाबीच ग्राह्य धरण्यात येतील. अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती / विवरणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

महत्वाच्या लिंक :

महावितरण अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक 

जाहिरातीमद्धे म्हटल्यानुसार ऑनलाइन अर्जाची लिंक वरील महावितरण च्या लिंक वर उपलब्द करण्यात येईल 

अर्ज भरायची अंतिम तारीख : अजून सांगण्यात आलेली नाही

इतर अटी : 

  1. जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अर्हता ही ‘किमान’ अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरु शकणार नाही.
  2. उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे, याची उमेदवाराने नोंद घ्यावी. मराठी भाषेचे ज्ञान असलेबाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. “माध्यमिक / शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा एस.एस.सी. किंवा विद्यापिठीय उच्च परीक्षा संबंधित मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा उमेदवार उत्तम रितीने मराठी भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचे संविधिक विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यानी प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र.”
  3. उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
  4. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर “तंत्रज्ञ” या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. “तंत्रज्ञ” पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील.
  5. भरती प्रक्रिये दरम्यान जर एखाद्या उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यात अपात्र ठरविण्यात येईल, याकरीता उमेदवार सर्वस्वी जबाबदार असेल, त्या अनुषंगाने उमेदवाराने खरी व अचूक अशी माहिती अर्जामध्ये नमूद करावी.
  6. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवारांनी कोणत्याही मार्गे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.
  7. जाहिरातीतील पदांची भरती प्रक्रियेबाबतचा कंपनीचा निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळीवर कोणाशीही केला जाणार नाही.
  8. भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रचार/हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  9. मागासवर्गीयांनी खुल्या प्रवर्गाअंतर्गत अर्ज केला असल्यास तो नमूद केलेला विकल्प बदलता येणार नाही. संबंधित मागासवर्गीयांस सर्व बाबी खुल्या प्रवर्गाचा उमेदवार म्हणून समजण्यात येईल.
  10. निवड झालेल्या उमेदवारास रिक्त पद आणि अनुशेष याच्या अनुषंगाने परिमंडळ कार्यालयाकडे सविस्तर पदस्थापनेकरिता वर्ग करण्यात येतील, अशा उमेदवारांना परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयाच्या ठिकाणी कंपनीच्या निकडीनुसार नियुक्त करण्यात येईल, याबाबत कंपनीचा निर्णय अंतिम राहील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.