DGPS, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध गट-क पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | DGPS bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं / १२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४.५. २०२२ अन्वये शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या कार्यालयामधील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरावयाची असून इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)5
वरिष्ठ मुद्रित शोधक3
मुद्रित शोधक10
दूरध्वनी चालक1
मूळप्रतवाचक2
बांधणी सहाय्यकारी33

 

शैक्षणिक पात्रता : 

पहिल्या 1-5 पदांसाठी : 

  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान. इतर पात्रता निकष आणि अनुभवासंबंधी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

बांधणी सहाय्यकारी : 

  1. कोणत्याही शासन मान्य शाळेतून इयत्ता ९ वी उत्तीर्ण.
  2. अवजड कामे करण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आवश्यक राहील.
  3. बांधणी प्रक्रियेतील फोल्डींग, गॅदरींग, काऊंटींग, रॅपिंग व लिफाफे तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव.
  4. नामांकित मुद्रणालयातील कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नाही अशा अनुभवाचे प्रमाणपत्र.
  5. बांधणी उदिमातील ३ वर्षे शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य.

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया लेखी आणि व्यावसायिक चाचणी द्वारे होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल .

DGPS, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध गट-क पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | DGPS bharti 2024

DGPS, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध गट-क पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | DGPS bharti 2024

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी :  

  • खुला प्रवर्ग : 1000/-
  • मागासवर्ग : 900/-

वेतन : 

पदाचे नाववेतन
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)एस-१०, रु.२९२०० – ९२३००
वरिष्ठ मुद्रित शोधकएस-१०, रु.२९२०० – ९२३००
मुद्रित शोधकएस-८, रु.२५५०० –  ८११००
दूरध्वनी चालकएस-७, रु. २१७०० –  ६९१००
मूळप्रतवाचकएस-६, रु.१९९००  -६३२००
बांधणी सहाय्यकारीएस-५, रु. १८००० –  ५६९००

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • Application Link वर Clik करुन उमेदवारास त्यांचे नाव, नावांत बदल झाला असल्यास त्याचा तपशील, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, E-mail ID इत्यादी प्राथमिक माहिती भरुन प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील.
  • नोंदणी झाल्यानंतर प्राप्त झालेल्या User ID व Password द्वारे Log in केल्यानंतर उमेदवारास वैयक्तिक माहिती (Personal Details)] अतिरिक्त माहिती (Additional Details) तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव यांचा तपशील भरण्याकरिता उपलब्ध होईल. सदर पदभरतीच्या अनुषंगाने पुढील सर्व कार्यवाहीकरिता उमेदवाराने त्याचा User ID व Password जतन करुन ठेवणे आवश्यक राहील.
  • उमेदवाराने -संपूर्ण अर्ज भरुन त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्र/दाखले इत्यादी अपलोड केल्यानंतर आवश्यक ते पदभरती परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत / वेळेत अदा करणे आवश्यक राहील. पदभरती परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर Payment Transaction Successful झाले असल्याबाबतची खातरजमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. Payment Transaction Successful झाल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज अंतिम समजण्यात येईल. तद्नंतर उमेदवारास अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.

महत्वाच्या लिंक :

DGPS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 29/02/2024

इतर सूचना : 

  • प्रशिक्षण:- निवड झालेल्या उमेदवाराने संबंधित प्रदांकरिता वेळोवेळी विहित केलेले प्रशिक्षण विहित कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक राहील.
  • सदर संपूर्ण पदभरती प्रक्रिया ही शासनाने पदभरती संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, आदेश निर्णय इत्यादी मधील तरतूदीनुसार करण्यात येईल.
  • सदर पदभरतीच्या अनुषंगाने कोणीही आर्थिक/इतर स्वरुपाची मागणी केल्यास उमेदवाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य (Anti-Corruption Bureau, Maharashtra State) यांचेकडे १०६४ या हेल्पलाईन क्रमांकांवर अथवा acbmaharashtra.net या मोबाईल अॅपद्वारे तक्रार नोंदवावी.

     

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात मदतीकरिता दूरध्वनीद्वारे Helpdesk No. ०२२-२३६३१७३३ व ०२२-२३६३१४३३ विस्तारित क्र. २२५ वर सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत संपर्क साधावा अथवा ई-मेल : gcp.mumbai@maharashtra.gov.in वर आपणास हव्या असलेल्या मदतीचा तपशील कळवावा.
  • पदांची संख्या, प्रवर्गनिहाय पदसंख्या, परीक्षा कोणत्याही टप्प्यावर स्थगित करणे, रद्द करणे, अर्शत: बदल करणे याबाबतचे सर्व.  अधिकार (अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती) यांना राहतील. याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही.
  • सदर भरतीच्या नियम/निकषांमध्ये भरती पूर्ण होईपर्यंत शासन अधिसूचना/शासन निर्णय/ शासन परिपत्रक / पत्रानुसार बदल झाल्यास त्या-त्या प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. ती सर्वांवर बंधनकार राहील.
  • पाळी निहाय काम करावे लागेल

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.