राज्य सरकारच्या गृह खात्यातील फॉरेन्सिक विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १२५ पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

राज्य सरकारच्या गृह खात्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (Directorate of Forensic Science Laboratories) अंतर्गत विविध १२५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या
वैज्ञानिक सहायक (गट क)54
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण), (गट क)15
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) (गट क)2
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)30
वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)5
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, (गट क)18
व्यवस्थापक (उपहार गृह) (गट क)1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
वैज्ञानिक सहायक (गट क)विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
किंवा
न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त | विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण), (गट क)विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) (गट क)मानसशास्त्र विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC
Science) परीक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, (गट क)विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण.
व्यवस्थापक (उपहार गृह) (गट क)माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या
उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.

 

निवड प्रक्रिया : निवड परीक्षेमार्फत होईल. परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. Normalization साठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

परीक्षा १०० गुणांची असेल आणि २०० गुण असतील. पद निहाय अभ्यासक्रम जाहिरातीमद्धे दिलेला आहे.

नोकरीचे ठिकाण : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळा

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे

अर्ज फी : 

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु. १०००/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

वेतन : 

पदाचे नाव वेतन श्रेणी 
वैज्ञानिक सहायक (गट क)S – 13 (35400-112400)
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण), (गट क)S – 13 (35400-112400)
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) (गट क)S – 13 (35400-112400)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)S – 8 (25500-81100)
वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)S – 8 (25500-81100)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, (गट क)S – 7 (21700-69100)
व्यवस्थापक (उपहार गृह) (गट क)S – 10 (29200-92300)

 

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्विकारण्यात येतील. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://dfsl.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

महत्वाच्या लिंक :

FSLअधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 27th February 2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.