10 वी 12 वी पास नोकरी : रेल्वे सुरक्षा बलात (RPF) 4660 जागांसाठी मेगा भरती भरती. | rpf si Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

रेल्वे भरती बोर्डाकडून नुकतीच रेल्वे सुरक्षा बलाच्या 4660 पदांसाठीच्या मेगा भरतीची घोषणा करण्यात आली. या भरती अंतर्गत सब इन्स्पेक्टर (SI) आणि कॉन्स्टेबल पदे भरण्यात येणार आहेत.

या भरती प्रकरीयेसंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
सब इन्स्पेक्टर452
कॉन्स्टेबल4208

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सब इन्स्पेक्टरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
कॉन्स्टेबलशासनमान्य बोर्डातून 10 वी पास.

 

निवड प्रक्रिया : निवड खालील 3 संभाव्य टप्प्यात होईल. या संबंधीची अधिक माहिती लवकरच देण्यात येईल.

  • संगणक आधारित चाचणी (CBT)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • शारीरिक मापन चाचणी (PMT)

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
सब इन्स्पेक्टर20 ते 28 वर्षे
कॉन्स्टेबल18 ते 28 वर्षे

 

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 500/- (ऑनलाईन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना ४०० रुपये रिफंड मिळतील.)
  • राखीव गट : 250/- (ऑनलाईन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना 250 रुपये रिफंड मिळतील.)

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
सब इन्स्पेक्टर35400/-
कॉन्स्टेबल21700/-

या सोबतच इतर सोयी सुविधा आणि भत्ते देण्यात येतील.

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करून रजिस्टर करा.
  • रेल्वेच्या ALP किंवा टेक्निनिशियन भारतीसाठी रजिस्टर केले असल्यास पुन्हा रजिस्टर करण्याची गरज नाही.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

रेल्वे RPF अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 14-05-2024

इतर सूचना : 

  1. वय (01.07.2024 रोजी): विहित कनिष्ठ/उच्च वयोमर्यादेच्या तपशीलांसाठी (वरच्या वयासह शिथिलता), कृपया RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केल्या जाणाऱ्या तपशीलवार CEN चा संदर्भ घ्या.
  2. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्याकडे पदांसाठी विहित केलेल्या सर्व पात्रता अटी आहेत/पूर्ण आहेत. विहित शैक्षणिक पात्रतेच्या निकालाची वाट पाहत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
  3. शारीरिक मापन (PMT) मानके आणि वैद्यकीय मानके: अधिकृत RRB वेबसाइट्सवर प्रकाशित CENs मध्ये तपशीलवार वर्णन केल्यानुसार, उमेदवारांनी ते ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्यासाठी विहित PMT आणि वैद्यकीय मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. लागू केलेल्या पदांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य आढळलेल्या उमेदवारांना कोणतीही पर्यायी नियुक्ती दिली जाणार नाही.
  4. बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी आरक्षण आणि योग्यता (PwBD): या पदांवर आहेत
  5. अपंग व्यक्तींसाठी योग्य म्हणून ओळखले गेले नाही. माजी सैनिकांसाठी आरक्षण (एक्सएसएम): अधिक माहितीसाठी, RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केल्या जाणाऱ्या तपशीलवार CEN चा संदर्भ घ्या.
  6. महिलांसाठी आरक्षण: १५% पदे महिलांसाठी राखीव आहेत. अधिक माहितीसाठी, RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केल्या जाणाऱ्या तपशीलवार CEN चा संदर्भ घ्या.
  7. SC/ST/OBC/EWS उमेदवारांसाठी आरक्षण: अधिक माहितीसाठी, तपशीलवार CENs पहा
  8. RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले जातील. 9.0 परीक्षेची पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT) त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन (PMT) अधिक तपशीलांसाठी तपशीलवार CENS पहा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.