10 वी 12 वी पास नोकरी : BECIL कंपनीत नोकरीची संधी; मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टाफ कार ड्रायव पदांसाठी भरती.  | BECIL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL ही भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्याचे मुख्य क्षेत्र ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंट, औद्योगिक डिजाइन आणि परियोजना व्यवस्थापन आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांतर्गत सेवाएं पुरवते,

BECIL कंपनीत मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टाफ कार ड्रायवर  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)64
स्टाफ कार ड्रायवर2

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
अनुभव असल्यास प्राध्यान
स्टाफ कार ड्रायवरमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
ड्रायविंग लायसन्स
GPS वापरायची सवय

 

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर स्किल टेस्ट / मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

वयोमर्यादा : 

पदाचे नाववयोमर्यादा
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)18 ते 45 वर्षे
स्टाफ कार ड्रायवर63 वर्षे

 

अर्ज फी : 

  • एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : 531/-
  • इतर प्रवर्ग : 885/-

वेतन : 

पदाचे नाववेतन
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)21215/-
स्टाफ कार ड्रायवरसरकारच्या धोरणानुसार

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • संबंधित जाहिरात निवडा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
  • फॉर्मच्या शेवटी दिलेल्या ईमेल वर सर्व कागदपत्रे पाठवा.

महत्वाच्या लिंक :

BCIL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 3/4/2024

इतर सूचना : 

  1. निवड विहित निकष आणि नोकरीच्या आवश्यकतेनुसार केली जाईल.
  2. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि जे आधीपासून समान/समान विभागात कार्यरत आहेत.
  3. चाचणी/कागदपत्र पडताळणी/वैयक्तिक मुलाखती/निवडीच्या ड्युटीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए/डीए भरला जाणार नाही.
  4. वरील पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइनच सादर करावा
  5. उमेदवारांना त्यांच्या कौशल्य चाचणी/मुलाखत/मुलाखतीसाठी ईमेल/टेलिफोनद्वारे सूचित केले जाईल.
  6. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्या अर्जाचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करावे. BECIL उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या माहितीमध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती स्वीकारणार नाही.
  7. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवा.
  8. अर्जदाराने सबमिट केलेल्या अर्जातील कोणत्याही टायपोग्राफिकल त्रुटीसाठी (जसे की ईमेल आयडी, मोबाइल नंबर इ.) BECIL जबाबदार राहणार नाही.
  9. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इत्यादींबाबत त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ सर्व कागदपत्रे अपलोड करण्याची विनंती केली आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.