जर तुम्ही या वर्षी १२ वी ची परीक्षा दिली असाल आणि पुढे भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याकडून नुकतीच टेक्निकल एन्ट्री स्कीमची (TES – 52) घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला 4 वर्षांचे ट्रेनिंग देण्यात येईल आणि त्यासोबतच कोर्स पूर्ण झाल्यावर इंजीनीरिंग पदवी देण्यात येईल आणि लेफ्टनंट म्हणून भरती करण्यात येईल. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :
- फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह १२ वी पास
- उमेदवाराने या वर्षीची JEE (mains) २०२४ परीक्षा दिलेली असावी.
निवड प्रक्रिया : उमेदवारच्या गुणांच्या आधारावर SSB इंटरव्ह्यु साठी निवड करण्यात येईल. मेरीट लिस्ट वेबसाइट वर प्रदर्शित करण्यात येईल. निवड झाल्यावर ट्रेनिंग 2 फेज मध्ये असेल.
- फेज 1 : तीन वर्षांसाठी सीएमई येथे एकात्मिक मूलभूत लष्करी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण, पुणे/MCTE, महू/MCEME, सिकंदराबाद येथे असेल.
- फेज 2 : आयएमए, डेहराडून किंवा नियुक्त पीसीटीए येथे एका वर्षासाठी एकात्मिक मूलभूत लष्करी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण होईल.
नोकरीचे ठिकाण : ट्रेनिंग झाल्यावर आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
वयोमर्यादा : 16 वर्षे 6 महीने ते 19 वर्षे 6 महीने
अर्ज फी : फी नाही
वेतन : ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात येईल . आणि वेतन लेवल 10 नुसार 56,100-1,77,500 असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा. आणि 2 प्रती काढून ठेवा.
- मुलाखतीला येताना फॉर्म सोबत 10, 12 वी मार्क्सशीट, ID प्रूफ , Jee Mains मार्क्सशीट घेऊन यावे.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 13/06/2024
इतर सूचना :
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये त्यांचे तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्मशी जोडलेल्या अटी आणि नियम वाचणे आवश्यक आहे.
- प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला UPSC द्वारे कोणत्याही परीक्षेत बसण्यास मनाई केली जाऊ नये.
- रिक्त पदे तात्पुरत्या आहेत आणि प्रशिक्षण क्षमतेनुसार बदलल्या जाऊ शकतात
- एसएसबी मुलाखतीसाठी, ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट मूळ कागदपत्रांसह स्व-साक्षांकित छायाप्रतीच्या दोन संचासह असणे आवश्यक आहे.
- SSB येथे झालेल्या चाचणीच्या परिणामी कोणत्याही दुखापतीच्या संदर्भात कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.
- मुलाखत Aug/Sep 2024 मध्ये होईल.
- उमेदवाराला कधीही अटक किंवा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा कोणत्याही प्रकरणात गुंतलेले नसावे
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.