पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता (आचारसंहितेपुर्वी) दिनांक १६/०३/२०२४ रोजीच्या दै. सकाळ, दै. लोकमत व दै. पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणनिहाय पदसंख्या, अर्हता व इतर अटी व शर्ती नमुद केलेप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. सदर बाबींची पुर्तता करणा-या पात्र अर्हताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागवण्यात येत आहेत,
या भरतीसंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्रिशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
- एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
- शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्त वजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली,
- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्षे ३० पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष ३३ पेक्षा अधिक नसावे.
- किंवा संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील.
शारीरिक अहर्ता :
निवड प्रक्रिया :
- जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोईस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि/ अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करुन अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/ प्र.क्र.५४/का.१३- अ, दि. ०४/०५/२०२२ अन्वये सदर पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
- ऑनलाईन परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी (परीक्षेचा निकाल) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
अर्ज फी :
- राखीव प्रवर्ग : ९००/-
- खुला प्रवर्ग : १०००/-
वेतन : (वेतनश्रेणी एस-६- १९,९००-६३,२००)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास 26/4/2024 पासून सुरवात होईल)
अर्ज भरायची अंतिम तारीख : १७/०५/२०२४ (सा. ६ पर्यंत)
इतर सूचना :
- पात्रता/आरक्षण संदर्भात अर्जामध्ये निर्विवादपणे दावा केलेला असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये प्रत्येक दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पात्रता/आरक्षणाचा दावा ग्राह्य समजला जाणार नाही.
- शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि) विभाग, सामान्य प्रशासन विभाग (माहिती व तंत्रज्ञान), विभागाकडील शासन निर्णय क्र. मातस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दि.०४.०२.२०१३, दि. ०८.०१.२०१८ व दि. १६.०७.२०१८ तसेच दि.१९.०३.२००३ अन्वये संगणक / अर्हतेबाबत कार्यवाही करण्यात येईल.
- सर्व पदांवरील उमेदवारांना महानगरपालिकेच्या सेवेत रूजू होण्यापूर्वी संबंधित पोलिस यंत्रणेकडून चारित्र्य व पूर्वचारीत्र्य पडताळणी अहवाल ०६ महिने कालावधीत सादर करणे बंधनकारक राहील. चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणी अहवाल प्रतिकूल/अवैध प्राप्त झाल्यास, उमेदवाराची केलेली निवड रद्द करण्यात येईल. व कोणत्याही हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- सर्व पदावरील उमेदवारांना महाराष्ट्र शासनाकडील आदेश क्र.एस.आर.व्ही -२०००/प्रक्र१७/२०००/२०१२,दि. ०१/०७/२००५ अन्वये दि. २८/०३/२००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या २ पेक्षा अधिक असल्यास संबधित उमेदवाराचा नेमणुकीसाठी विचार करण्यात येणार नाही. तसे विहित नमुन्यात र.रु.५००/- चे स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवारांची अतिम निवड झाल्यावर नियुक्तीपूर्वी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यामध्ये शारीरीक व मानसिकदृष्ट्या तो पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती दिली जाईल. मनपा रुग्णालयाने अपात्र ठरविलेस कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल. अर्जातील माहिती बदलाबाबत नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा बदल विचारात घेतले जाणार नाहीत.
- निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती नंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व वेळोवेळी होणा-या सुधारणेनुसार सर्व नियम लागू होतील.
- पात्र उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा / कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने यावे लागेल.
- वरिल सर्व पदांच्या मूळ कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाच्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये नेमणूकीकरीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दतीमध्ये नमूद अनुभवामधील प्रशासकीय कर्तव्ये व जबाबदा-या यांचे स्वरुप असलेला अनुभव नमूद करणे आवश्यक आहे.
- सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्र. एसआरव्ही-२००४/प्र.क्र.१०/४/१२, दि.०३/०७/२००४ अन्वये नियुक्तीसाठी ज्या पदांकरीता अनुभव आवश्यक आहे, त्या पदांकरीता विहीत केलेनुसार अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.