१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत ८००० हून अधिक पदांसाठी भरती. | ssc mts recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

१० पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत ८००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या 
मल्टी टास्किंग स्टाफ4887
हवालदार3439

 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास

निवड प्रक्रिया :

  • MTS पदांसाठी ऑनलाइन टेस्ट घेण्यात येईल आणि हवालदार पदांसाठी ऑनलाइन टेस्ट सोबतच फिजिकल टेस्ट घेण्यात येईल.
  • परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

SSC MTS Exam Pattern

फिजिकल टेस्ट चे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत ८००० हून अधिक पदांसाठी भरती. | ssc mts recruitment 2024

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

वयोमर्यादा

पदाचे नाव वयोमर्यादा
मल्टी टास्किंग स्टाफ18 -25  वर्षे
हवालदार18 -27  वर्षे

 

अर्ज फी :

  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 100/-

वेतन : 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1 मध्ये असेल

अर्ज कसा भरावा :  

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • सर्व प्रथम SSC पोर्टल वर तुमची सर्व माहिती भरून रजिस्टर करा.
  • रजिस्टर केल्यावर HOME पेज वर अप्लाय वर क्लिक केल्यावर Multi Tasking (Non-Technical) Staff Examination,2024 भरतीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून फॉर्म भरू  शकता.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

SSC MTS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 31-07-2024

इतर सूचना :

  1. जे उमेदवार पीईटी/पीएसटी पात्र ठरू शकत नाहीत त्यांचा हवालदार पदासाठी विचार केला जाणार नाही. तथापि, CBE मधील त्यांच्या गुणवत्तेनुसार, त्यांची उमेदवारी MTS पदासाठी वैध राहील.
  2. उमेदवारांना त्यांच्या स्वत: च्या हितासाठी सल्ला दिला जातो की त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज सबमिट करावे आणि शेवटच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करू नये.
  3. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा ते इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी समायोजित केले जाणार नाही.
  4. समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार दस्तऐवज पडताळणीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून संबंधित समतुल्य प्रमाणपत्र देखील सादर करतात.
  5. ओबीसींच्या आरक्षणाच्या आधारावर नियुक्तीची मागणी करणाऱ्या व्यक्तीने निर्णायक तारखेला तो क्रिमी लेयरमध्ये येणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  6. उमेदवारांना त्यांच्या निवडीची शक्यता सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पसंती देण्याचा सल्ला दिला जातो.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.