10 वी 12 वी पास नोकरी : रेल्वेत नोकरीची संधी; विविध ३४४५ क्लार्क पदांसाठी भरती. | RRB Non Technical Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नोकरीच्या शोधात असणाऱ्या १२ वी पास किंवा पदवीधरांसाठी खुश खबर. रेल्वे तर्फे बहुप्रतिक्षित RRB Non Technical भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ३४४५ पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे

पदाचे नावपदांची संख्या
कमर्शियल कम तिकीट क्लार्क2022
अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट361
ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट990
ट्रेन्स क्लार्क72
RRB Non Technical Recruitment Qualification / RRB Non Technical भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कमर्शियल कम तिकीट क्लार्कमान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १२ वी पास.
अकाउंट क्लार्क कम टायपिस्टमान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १२ वी पास.  आणि हिंदी आणि इंग्रजी टायपिंग मधे प्रविनता असणे आवश्यक.
ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्टमान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १२ वी पास.  आणि हिंदी आणि इंग्रजी टायपिंग मधे प्रविनता असणे आवश्यक.
ट्रेन्स क्लार्कमान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १२ वी पास.
एससी / एसटी / दिव्यांग / माजी सैनिक / उच्च शिक्षित यांना १२ वी मध्ये ५० टक्क्यांची अट नाही.
RRB Non Technical Recruitment Selection Procedure / RRB Non Technical भरती निवड प्रक्रिया : 

पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन (CBT) टेस्ट घेण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

RRB Non Technical exam pattern

ऑनलाईन (CBT) नंतर पुढच्या टप्प्यासाठी निवड करण्यात येईल..

RRB Non Technical Recruitment Place of Work / RRB Non Technical भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

RRB Non Technical Recruitment Age limit / RRB Non Technical भरती वयोमर्यादा : 

18 ते 33 वर्षे

RRB Non Technical Recruitment Application fee / RRB Non Technical भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला  : २५०/-(CBT परीक्षा दिल्यावर सर्व  २५० रुपये रिफंड होतील)
  • इतर प्रवर्ग : ५००/- (CBT परीक्षा दिल्यावर ४०० रुपये रिफंड होतील)
RRB Non Technical Recruitment Salary / RRB Non Technical भरती वेतन : 

सुरवातीला वेतन खालील प्रमाणे असेल.

पदाचे नाववेतन
कमर्शियल कम तिकीट क्लार्क21700
अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट19900
ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट19900
ट्रेन्स क्लार्क19900
RRB Non Technical Recruitment Application Procedure / RRB Non Technical भरती अर्ज कसा भरावा :
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा, न्यू युजर असल्यास नवीन अकाऊंट क्रिएट करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
RRB Non Technical Recruitment Last Date / RRB Non Technical भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

२०/१०/२०२४

महत्वाच्या लिंक :

आरआरबी अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  • उमेदवाराने विहित पात्रता अटी पूर्ण केल्यानंतरच भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमध्ये प्रवेश हा पूर्णपणे तात्पुरता असेल. उमेदवारांना फक्त ई-कॉल लेटर दिल्याने त्यांची उमेदवारी शेवटी RRB कडून मान्य केली आहे असे धरता येणार नाही.
  • या अधिसूचनेअंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय मानकांसह सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करून घ्यावी. जे उमेदवार कोणत्याही RRB/RRC कडून आजीवन किंवा अद्याप पूर्ण न झालेल्या कालावधीसाठी निलंबित आहेत, त्यांनी या अधिसूचनेकरिता अर्ज करू नये.
  • भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमध्ये उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या सर्व कागदपत्रांवर एकसारख्याच असणे आवश्यक आहे. कोणत्याही टप्प्यावर अधिसूचित रिक्त पदे रद्द करण्याचा अधिकार रेल्वे प्रशासनाकडे राखीव आहे.
  • RRB द्वारे केलेल्या निवडीमुळे उमेदवारांना रेल्वेमध्ये नियुक्तीचा अधिकार मिळणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना आवश्यक तेथे प्रशिक्षण घ्यावे लागेल, आणि प्रशिक्षण कालावधीत लागू असेल तसा स्टायपेंड मिळेल. निवडलेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये रुजू होताना आवश्यकतेनुसार जामीन आणि/किंवा नुकसानभरपाई बाँड सादर करावा लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.