जर आपण मुंबई मध्ये राहत असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई मधे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून वाढत्या महागाईत जगणे सामान्य जनतेला खूप त्रासदायक होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार मा.श्री. आदित्य ठाकरे साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके विभागप्रमुख, मुंबई पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. ॲड.श्री. अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यात देशातील एकूण १२५ नामांकित कंपन्यांचा सहभाग असून या मधे बँकिंग , शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, आयटी, नॉन बँकिंग अँड इन्शुरन्स, BPO, लॉजिस्टिक्स, फार्मा, रिटेल, लॅटरल प्रॉफिट इ. क्षेत्रातील कंपन्या भाग घेणार आहेत. आणि अंदाजे १०,००० नोकऱ्या शिवसेनेमार्फत उपलब्ध होत आहेत.
तरी आपल्या विभागातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींनी ह्या नोकरीच्या संधीचा फायदा करून घ्यावा ही विनंती.
महानोकरी मेळाव्यात सामिल होऊन प्रतिष्ठित कंपन्यांकडे मुलाखतीची संधी मिळविण्यासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन फॉर्म ची लिंक खाली देण्यात आली आहे.
Shivsena UBT Maha Nokari Rojgar Melava Qualification :
या मेळाव्यात दहावी , बारावी पास तसेच विविध शाखांतील पदवीधर, पदव्युत्तर, अंडर ग्राज्युएट उमेदवार भाग घेऊ शकतात.
शिवसेना नोकरी मेळावा स्थल आणि तारीख / Shivsena UBT Maha Nokari Rojgar Melava Place and Date
- तारीख : शनिवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी
- वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
- स्थळ : १बी, टी १ तळमजला, सहारा हॉटेल जवळ, बालाजी रेस्टॉरंट चा बाजूला विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००९९.
- ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२४
ऑफलाईन फॉर्मसाठी जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करावी.
नव्या वाटा, नवी संधी
उज्ज्वल भविष्यासाठी, साथ शिवसेनेचीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित महा नोकरी मेळावा..
तारीख: ०५ ऑक्टोबर २०२४
वेळ: स. ०९:०० ते सायं. ०६:०० पर्यंत
स्थळ: १८ MLCP पार्किंग, T1 तळमजला, सहारा हॉटेलजवळ, बालाजी रेस्टॉरंटच्या ATC टॉवरसमोर, विलेपार्ले (पूर्व),… pic.twitter.com/P5QZXJgIql— Anil Parab (@advanilparab) September 26, 2024