बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणार्या टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालयात 7 डेटा एन्ट्री ऑपरेटर पदे भरण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
(अ)
1. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
आणि
2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य / विज्ञान /कला/ विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
(ब) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
(क) उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
(ड)
1. उमेदवाराजवळ एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र. मातंस 2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 मध्ये नमूद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तर्णी केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
(इ) डेटा एन्ट्री ऑपरेटर कामकाजाचा अनभव असल्यास त्यांना प्राध्यान्य दिले जाईल
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी करुन निवड यादी प्रसारीत करण्यात येईल व निवड यादीतील उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : उमेदवारोचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये
अर्ज फी : NA
वेतन : निश्चित वेतन दरमहा रु. 18000/- निश्चित (कोणताही भत्ता अनुज्ञेय नाही)
अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे,
- विहित नमुन्यात सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज, अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटवून अर्ज बा. य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008 या पत्त्यावर पाठवावा.
- अर्जसोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड/ पासपोर्ट / वाहनचालक परवाना / वीज देयक [बिल] / दुरध्वनी देयक [बिल])
- ओळख पुरावा (आधार कार्ड/ वाहनचालक परवाना / पारपत्र [पासपोर्ट ] / मतदान ओळखपत्र)
- माध्यमिक शालांत परिक्षेची गुणपत्रिका (एसएससी)
- उच्च माध्यामिक परिक्षेची गुणपत्रिका (एचएससी)
- पदवी परिक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
- इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
- एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- दोन पासपोर्ट आकाराची अलिकडील काढलेली छायाचित्रे शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेली इतर कागदपत्रे.
- अनुभव प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/3/2024
इतर सूचना :
- सादर निवड ही कंत्राटी पद्धतीने असेल. कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर पद नियमित स्वरुपातील नसून नियमित उमेदवार भरेपर्यत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राट कालावधी करिता असेल.
- रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार नेमणूका करण्यात येतील.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यासापेक्ष आहे.
- पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा.
- उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता / व्यवसायिक अर्हता / संबंधित गुणपत्रिका साक्षांकितछायाप्रत जोडावी.
- निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 500/- च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
- कामकाजातील त्रुटी, कर्तव्यावरील अनुपस्थिती तसेच वागणूक आणि कार्यालयाकडे सादर केलेल्या करारनामाचा भंग केल्यास अथवा पालन न केल्यास कंत्राटी उमेदवारांची सेवा त्याचक्षणी तात्काळ समाप्त करण्यात येईल.
- कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा-यांना नियमित पदांकरिता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत. तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल.
- कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या उमेदवाराची सेवा आवश्यकता वाटल्यास कधीही तसेच कुठलीही पूर्व सूचना न देता समाप्त करण्यात येईल
- कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी नियमित नियुक्तीसाठी भविष्यात हक्क सांगता येणार नाही. नियमित नियुक्तीच्या वेळी कंत्राटी तत्वावर काम केलेल्याचा विचार केला जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.