मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी भरती. | BARC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

BARC (Bhabha Atomic Research Centre) हे भारतीय परमाणु अनुसंधान केंद्र आहे ज्यात विभिन्न शास्त्रज्ञान, प्रौद्योगिकी, अनुसंधान व अभियांत्रिकीच्या क्षेत्रात काम केले जाते. या संस्थेचे मुख्य काम अणु शक्ती विकास, प्रक्रिया विकास, वैज्ञानिक अनुसंधान, रासायनिक व अन्य प्रौद्योगिकी तंत्रज्ञानाची विकास आणि संचालन आहे.

BARC च्या रेडिएशन मेडिसिन सेंटर मध्ये वैज्ञानिक सहाय्यक (scientific assistant/B) पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी , मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स मधे किमान ६०% गुणांसह B.sc पदवी.

निवड प्रक्रिया :

  • निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
  • हॉस्पिटल मध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • जर 15 पेक्षा जास्त उमेदवारांचा प्रतिसाद असेल, तर उमेदवारांची B.Sc मध्ये मिळालेल्या सर्वोच्च टक्केवारीच्या (एकूण) आणि कामाचा अनुभव यांच्या आधारावर मुलाखत घेतली जाईल.

नोकरीचे ठिकाण : BARC, मुंबई

वयोमर्यादा : 50 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : 19,502 + DA

अर्ज कसा भरावा : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण खालील प्रमाणे. मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे.

  • ठिकाण : Conference Room No. 2, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai-400 094.
  • तारीख : 16/05/2024
  • वेळ : दुपारी १ वाजता

महत्वाच्या लिंक :

BARC अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 16/5/2024

इतर सूचना : 

  1. उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे, प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा.
  2. निवडलेल्या उमेदवारांना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पोलिस पडताळणी प्रमाणपत्र देखील घ्यावे लागेल.
  3. ज्या उमेदवारांनी 13.45 वाजेपर्यंत रीतसर अर्ज (झेरॉक्स प्रती आणि छायाचित्रे इत्यादीसह) भरले आहेत, फक्त त्यांचीच मुलाखत घेतली जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.