भारतीय सैन्याकडून घेण्यात येणाऱ्या B.sc नर्सिंग कोर्सची घोषणा करण्यात आली आहे. या कोर्स अंतर्गत आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या नर्सिंग कॉलेज मध्ये ४ वर्षांच्या कोर्स साठी निवड केली जाते. या मधे महाराष्ट्रातील पुण्यातील AFMC, पुणे कॉलेजचा ही समावेश आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यावर उमेदवारांची सैन्य, हवाईदल आणि नौदलामध्ये मेडिकल नर्सिंग सर्व्हिसेस ऑफिसर
म्हणून निवड केली जाते. या कोर्स संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :
- NTA द्वारे घेण्यात येणारी NEET – UG 2024 परीक्षा उत्तीर्ण असावा.
- 12 वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि इंग्लिश विषय असावेत आणि किमान 50% पेक्षा जास्त गुण असावेत.
निवड प्रक्रिया : NEET स्कोअरच्या आधारावर उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : कॉलेज नुसार उपलब्ध जागांची संख्या खालील प्रमाणे. कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यकतेनुसार देशभर कुठेही नेमणूक केली जाईल.
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर. १९९९ ते ३० सप्टेंबर २००७ मधला असावा (दोन्ही तारखा धरून)
अर्ज फी :
- एससी / एसटी : फी नाही
- इतर प्रवर्ग : 200/-
वेतन : कोर्स पूर्ण झाल्यावर मेडिकल नर्सिंग सर्व्हिसेस ऑफिसर म्हणून निवड होईल. वेतन शासनाच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- NEET – UG 2024 चा रिजल्ट लागल्यावर इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाइट वरून अर्ज करू शकतात.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
(NEET – UG 2024 चा रिजल्ट लागल्यावर अर्ज स्वीकारण्यास सुरवात होईल.)
अर्ज भरायची अंतिम तारीख : NA
इतर सूचना :
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे आणि ते काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- आवश्यक वाटल्यास उपरोक्त अटी बदलाच्या अधीन आहेत
- निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना कार्यक्षम फोन नंबर आणि ईमेल आयडी ठेवण्याची विनंती केली जाते. मेल आयडी किंवा फोन नंबर बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.