टेक्सटाइल कमिटी अंतर्गत नोकरीची संधी; मुंबई व इतर ठिकाणी यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती. | Textiles Committee Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

टेक्सटाइल्स कमिटी ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक संस्था आहे. तिची स्थापना 1963 साली करण्यात आली होती. या कमिटीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय वस्त्र उद्योगाचा विकास करणे, गुणवत्तेचे मापन व प्रमाणीकरण करणे, तसेच उद्योगाला आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि सल्ला प्रदान करणे हे आहे. कमिटी विविध तपासणी, परीक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन देते व जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक बनवते.

टेक्सटाइल्स कमिटीमध्ये यंग प्रोफेशनलच्या ४० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिक्स किंवा केमिस्ट्री विषयामध्ये B.Sc पदवी किंवा टेक्सटाइल टेक्नॉलॉजी मधे B.Tech पदवी.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

नोकरीचे ठिकाण : मुंबई मध्ये १० जागा (HQ : 7  + JNPT : 3) आणि देशातील इतर विविध ठिकाणी ३० जागा

वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : 26000/-

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना खाली दिलेला आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता :

मुंबई : Textiles Committee P. Balu Road,  Off Veer Savarkar Marg, Prabhadevi Chowk, Prabhadevi, Mumbai – 400 025

संपर्क : Tel  (022)  6652 7545, 66527519, 66527520 E-mail: tclabmumbai@gmail.com

JNPT : Textiles Committee, Ground Floor, Port Users Building, Jawaharlal Nehru Port Trust, Nhava Sheva, Navi Mumbai- 400 707 

संपर्क : Tel :  (022) 27240020 E-mail  : tclabjnpt@gmail.com

महत्वाच्या लिंक :

टेक्सटाइल कमिटी अधिसूचना जाहिरात 

अर्जाचा नमूना

अर्ज भरायची अंतिम तारीख : ३१/०५/२०२४

इतर सूचना : 

  1. 31 मार्च 2024 नुसार किमान/कमाल वयोमर्यादा गणली जाईल
  2. पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्याचा अधिकार समितीने राखून ठेवला आहे.
  3. ही ऑफर पूर्णपणे तात्पुरती आणि 3 वर्षांच्या अल्प मुदतीसाठी आहे. निवडलेल्या व्यक्तींना नियमितपणे नियुक्तीसाठी किंवा एक वर्षाच्या पुढे चालू ठेवण्यासाठी कोणताही अधिकार दिला जाणार नाही.
  4. कोणताही TA/DA भरला जाणार नाही
  5. उमेदवाराने त्याचा/तिचा अर्ज फक्त एका प्रदेशात पाठवावा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.