Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय, विभाग अंतर्गत सरकारी अनुसूची ‘A’ PSUs असून संरक्षण उत्पादन, प्रामुख्याने युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याचे काम करते.
माझगाव डॉक कंपनीत अप्रेंटीस अंतर्गत 2024 करीता 518 व्यवसाय प्रशिक्षणार्थीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
ग्रुप “क | |
ड्राफ़्ट्मेन (मेकेनिकल) | 21 |
इलेक्ट्रिशियन | 32 |
फिटर | 53 |
पाइप फिटर | 55 |
स्ट्रक्चरल फिटर | 57 |
ग्रुप “ख | |
फिटर स्ट्रक्चरल (एक्स आई.टी.आई. फिटर | 50 |
ड्राफ़्ट्मेन (मेकेनिकल) | 15 |
इलेक्ट्रिशियन | 25 |
आई.सी.टी.एस.एम | 20 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 30 |
आर.ए.सी | 10 |
पाइप फिटर | 20 |
वेल्डर | 25 |
सी.ओ.पी.ए | 15 |
कारपेन्टर | 30 |
ग्रुप “ग” | |
रिगर | 30 |
वेल्डर (गैस एवं इलेक्ट्रिक) | 30 |
शैक्षणिक पात्रता :
ग्रुप ‘क’
- उमेदवार इयत्ता 10 वी ची परीक्षा (एस॰एस॰सी॰ परीक्षा) विज्ञान आणि गणित विषयांसह उत्तीर्ण असावा
- सर्वसाधारण/ ओ.बी.सी./ई.डब्लू.एस./ दिव्यांग / एएफसी उमेदवारांकरीता कमीत कमी 50% गुण.
- अ०जा० आणि अ०ज० उमेदवारांकरीता उत्तीर्ण श्रेणी.
- जर उत्तीर्ण निकषाच्या बाबतीत उत्तम 5 विषय घेतले असतील, तर उमेदवार इयत्ता 10 वी ची परीक्षा विज्ञान आणि गणित विषयांसह उत्तीर्ण असावा अन्यथा अर्ज नाकारला जाईल
- जरी योग्यता निकष एस॰ एस॰सी॰परीक्षा आहे, तरी उच्च शिक्षित उमेदवारदेखील अर्ज करू शकतात मात्र पात्रता एस॰एस॰सी॰ परीक्षेच्या गुणांवर आधारीत असेल.
ग्रुप ‘ख’
- उमेदवार फिटर / ड्राफ्ट्समेन (मेकेनिकल) / इलेक्ट्रिशियन / आई.सी.टी.एस.एम/ इलेक्ट्रोनिक मैकेनिक / प्लम्बर / वेल्डर / कंप्यूटर ऑपरेटर एवं प्रोग्रामिंग असिस्टेंट । कारपेंटर / रेफ्रीजरेशन एवं एयर कंडीशनिंग व्यवसाय मध्ये आई.टी.आई. शासकीय / शासकीय मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (औ० प्र०सं०) उत्तीर्ण असावा
- सर्वसाधारण/ ओ.बी.सी./ई.डब्लू.एस./ दिव्यांग / एएफसी उमेदवारांकरीता कमीत कमी 50% गुण.
- अ०जा० आणि अ०ज० उमेदवारांकरीता उत्तीर्ण श्रेणी जे उमेदवार सेमिस्टर सिस्टम मध्ये प्रशिक्षण घेत आहेत, ते मागील सेमिस्टर मधील पेपर्स / विषय राहिले असल्यास त्या विषयामध्ये उतीर्ण झालेले असावेत आणि यासंदर्भात इंस्टीट्यूटने सर्टिफाई केलेले असावेत.
ग्रुप ‘ग’
- उमेदवार इ० 8 वी ची परीक्षा (10+2 अभ्यासक्रमाअंतर्गत) विज्ञान आणि गणित विषयांसह उत्तीर्ण असावा i) सर्वसाधारण/ ओ.बी.सी./ई.डब्लू.एस./ दिव्यांग / एएफसी उमेदवारांकरीता कमीत कमी 50% गुण°
- अ०जा० आणि अ०ज० उमेदवारांकरीता उत्तीर्ण श्रेणी°
- जरी योग्यता निकष इयत्ता 8 वी ची परीक्षा आहे, तरी उच्च शिक्षित उमेदवारदेखील अर्ज करू शकतात मात्र पात्रता इयत्ता 8 वी ची परीक्षेच्या गुणांवर आधारीत असेल
निवड प्रक्रिया : प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत संपन्न होईल.
- पहिला टप्पा : ऑनलाइन परीक्षा (कंप्यूटर बेस्ड टेस्ट CBT): ऑनलाइन परीक्षेसाठी (कंप्यूटर बेस्ड टेस्ट CBT) प्रत्येक ग्रुपसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे असेल. ग्रुप’क’ 10 वी इयत्ता उत्तीर्ण, ग्रुप ‘ख’ आय टी आय पास व ग्रुप ‘ग’ 8 वी इयत्ता उत्तीर्ण. पात्र उमेद्वारास खालील पाठ्यक्रमावर आधारित 100 मार्काची परीक्षा (CBT) द्यावी लागेल. त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल..
- दूसरा टप्पा कागदपत्र तपासणी आणि ट्रेड वितरण आणि तिसरा टप्पा वैद्यकीय चाचणी असेल.
नोकरीचे ठिकाण : माझगाव डॉक, मुंबई
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
ग्रुप “क | 15-19 वर्षे |
ग्रुप “ख | 16-21 वर्षे |
ग्रुप “ग” | 14-18 वर्षे |
अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग : फी नाही
- इतर प्रवर्ग : 100/-
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
ग्रुप “क | प्रथम 3 माह रु. 3000/- तत्पश्चात 9 माह रु. 6000/-, द्वितिय वर्ष रु. 6600/- |
ग्रुप “ख | रु. 8050/- |
ग्रुप “ग” | रु. 7700/ |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- इच्छुक उमेदवारांनी माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या संकेतस्थळावरती Career / Online Recruitment → Apprentices या शीर्षकाखाली भेंट ध्यावी.
- नंतर नवीन नोंदणीकरीता Create New Account क्लिक करा आणि अर्जाकरीता लॉग इन करुन अप्लाय करू शकतात.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 02/07/2024
इतर सूचना :
- ऑनलाइन आप्रेंटिस पोर्टलमध्ये कोणतीही संदिग्धता/विसंगती आढळल्यास या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती कायम राहतील.
- कोणतीही पुढील माहिती / शुद्धीपत्र / परिशिष्ट फक्त MDL वेबसाइटवर अपलोड केले जाईल.
- भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी जाहिरात केलेल्या सर्व रिक्त जागा भरण्याचा किंवा काही भाग किंवा संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार MDL राखून ठेवते.
- पात्रता निकष, कौशल्य/व्यापार चाचणी निवड या सर्व बाबतीत व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल. या संदर्भात कंपनीकडून कोणतेही प्रतिनिधित्व किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- एमडीएल व्यवस्थापन उमेदवारांचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा/बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.