मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ; या शाखेतील उमेदवारांना मिळणार दर महा १०,००० पर्यंत वेतन | Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित
ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये १२ वी पास, विविध ट्रेड मधील आय.टी.आय., पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Qualification / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शैक्षणिक पात्रता : 
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयम  या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Selection Procedure / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना निवड प्रक्रिया : 

विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी महास्वयम या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. इच्छुक उमेदवार संबंधित कंपनीतिल रिक्त पदांसाठी आवेदन करू शकतात.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Place of Work / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नोकरीचे ठिकाण : 

महाराष्ट्रात कुठेही.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Age limit / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वयोमर्यादा : 

उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Application fee / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्ज फी : 

फी नाही

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Salary / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वेतन : 
शैक्षणिक अर्हताप्रतिमाह विद्यावेतन रु.
१२ वी पासरु. ६,०००/-
आय.टी.आय/ पदविकारु. ८,०००/-
पदवीधर / पदव्युत्तररु. १०,०००/-
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Application Procedure / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्ज कसा भरावा : 
महत्वाच्या लिंक :

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
  2. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
  3. सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
  4. संपर्क अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८०० १२० ८०४० वर संपर्क साधावा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.