माझी नोकरी : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात विविध 255 पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमूद केल्लेप्रमाणे एकुण-२५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक महाधि कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्लांच्या वेदावर ऑनलाईन Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

पदाचे नावपदांची संख्या
लिपिक१२५
वरिष्ठ लिपिक३१
लघु लेखक निम्न श्रेणी
मिश्रक२७
शिक्षक१२
शिवणकाम निर्देशक१०
सुतारकाम निर्देशक१०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
बेकरी निदेशक
ताणाकर
विणकाम निदेशक
चर्मकला निदेशक
यंत्र निदेशक
नीटिंग अँड विवींग निदेशक
करवत्या
लोहारकाम निदेशक
कातारी
गृह पर्यवेक्षक
पंजा व गालाची निदेशक
ब्रेललिपी निदेशक
जोडारी
प्रिप्रेटरी
मिलिंग पर्यवेक्षक
शारीरिक कवायत निदेशक
शारीरिक शिक्षण निदेशक
एकूण२५५

 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 21/01/2024

शैक्षणिक पात्रता :

वर दिलेल्या पदांनुसार प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. सविस्तर पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक पहा.

  • जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी प्रत्येक पदांसमोर दर्शविण्यात आलेली शैक्षणिक अर्हता जाहिरात प्रसिद्धी दि. १.१.२०२४ रोजी उमेदवाराने पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि) क्र. मातंस-२०१२/प्र.क्र.२७७/३१ दि.०४.०२.२०१३ मध्ये नमूद
  • केल्यानुसार संगणक माहिती तत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन
  • निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रशिक्षण २००० /प्र.क्र.६१/२००१/३९, दि.१९.०३.२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासुन २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे बंधनकारक राहील. 
  • लिपिक या पदासाठी नियुक्तीचे दिनांकापासून दोन वर्षाचे आत मराठी -३० शब्द प्रति मिनीट व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनीट टंकलेखनाची परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.

निवड प्रक्रिया : 

सदर भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परिक्षेमार्फत होणार आहे.

परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे.

माझी नोकरी : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात विविध 255 पदांसाठी भरती.

नोकरीचे ठिकाण : NA

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे.

इतर राखीव प्रवर्गासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अर्ज फी : खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये

राखीव प्रवर्ग : ९०० रुपये

पगार : २५५०० ते ८११०० .

पदांनुसार पगार जाहिरातीमध्ये दिला आहे.

अर्ज कसा भरावा :

  1. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  2. अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ:- http://www.mahaprisons.gov.in
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सुचना http://www.mahaprisons.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  4. अर्ज सादर केल्यानंतर मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. पाच) अर्ज भरण्याची व परोक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखोला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीत अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे

महत्वाच्या लिंक :

महाराष्ट्र कारागृह भरती अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.