Majhi Naukri : एमपीएससी कडून बहूचर्चित कृषि सेवा भरतीची घोषणा ; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया | MPSC Krushi Seva Bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात मा. आयोगाची दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्यात येत आहे.

शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ परीक्षेमधून महाराष्ट्र कृषि सेवेच्या भरावयाच्या एकूण २५८ पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे ;

पदाचे नाव पदांची संख्या 
उप संचालक, कृषि, गट-अ48
तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, गट-ब53
कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब127
MPSC Krushi Seva Recruitment Qualification / एमपीएससी कृषि सेवा भरती शैक्षणिक पात्रता : 
  1. मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता.
  2. त्याच बरोबर खालील पदवीधरही अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
    • बी.एसस्सी (कृषि जैव तंत्रज्ञान)
    • बी.एसस्सी (कृषि व्यवसाय व्यवस्थापन)
    • बी.एसस्सी (गृह विज्ञान)
    • बी.टेक (अन्नतंत्र)
    • बी.एफ.एसस्सी.
    • बी.एसस्सी. (उद्यानविद्या)
    • बी. एससी (ऑनर्स) उद्यानविद्या
    • बी. एससी (ऑनर्स) वनविद्या
    • बी. एससी (ऑनर्स) सामाजिक विज्ञान
    • बी. एफ.एससी (मत्स्य विज्ञान)
    • बी. टेक (कृषि अभियांत्रिकी)
    • बी. टेक (अन्नतंत्रज्ञान)
    • बी. टेक (जैवतंत्रज्ञान)
    • बी. एससी. (एबीएम)/ बी. बी. एम (कृषि)/बी. बी. ए. (कृषि)/ बी. एससी (ऑनर्स) कृषि व्यवसाय व्यवस्थापन

 

MPSC Krushi Seva Recruitment Selection Procedure / एमपीएससी कृषि सेवा भरती निवड प्रक्रिया : 

सदर पदांची निवड महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ नुसार होणार आहे होणार आहे.

निवड प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

MPSC Krushi Seva Recruitment Place of Work / एमपीएससी कृषि सेवा भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार महाराष्ट्रभर कुठेही.

MPSC Krushi Seva Recruitment Age limit / एमपीएससी कृषि सेवा भरती वयोमर्यादा : 

१९ ते ३८ वर्षे

MPSC Krushi Seva Recruitment Application fee / एमपीएससी कृषि सेवा भरती अर्ज फी : 
  • अमागास – रु. ५४४/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-
MPSC Krushi Seva Recruitment Salary / एमपीएससी कृषि सेवा भरती वेतन : 

शासनाच्या नियमांनुसार असेल.

MPSC Krushi Seva Recruitment Application Procedure / एमपीएससी कृषि सेवा भरती अर्ज कसा भरावा : 
  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. सर्वप्रथम अकाऊंट क्रिएट करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
  3. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२४ मधील फक्त कृषि सेवेकरीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी “Online Application” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या “Check Eligibility” बटनावर क्लिक करुन अर्ज सादर करण्याची पुढील कार्यवाही करावी.
  4. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२४ करीता यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार कृषि सेवेकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी कृषि सेवेकरीता विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील “My Account” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या ” View ” बटनावर व त्यानंतर “Recheck Eligibility” बटनावर क्लिक करून ” उजव्या बाजूकडील स्तंभामधील” कृषि सेवेतील ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून “Apply व Submit” बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
  5. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेसाठी दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील सेवेसाठीचा दावा तसेच प्रस्तुत सेवेचा दावा कायम समजण्यात येईल. सदर विकल्प सादर करताना मूळ अर्जातील दाव्यांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
MPSC Krushi Seva Recruitment Last Date / एमपीएससी कृषि सेवा भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

दिनांक १७ ऑक्टोबर, २०२४ रोजी २३:५९

महत्वाच्या लिंक :

एमपीएससी कृषि सेवा भरती अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 

  1. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेकरिता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा मूळ जाहिरातीमधील तरतुदीनुसार म्हणजेच दिनांक १ एप्रिल, २०२४ असा राहील.
  2. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज सादर करताना अपलोड करावयाच्या सर्व कागदपत्रांसंबंधीच्या तरतुदी प्रस्तुत शुद्धिपत्रकाकरिता लागू राहतील. सदर तरतुदीनुसार उमेदवारानी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील.
  3. प्रस्तुत शुद्धिपत्रकान्वये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील पदसंख्येत बदल/सुधारणा झाल्यामुळे विषयांकित परीक्षेमधून एकूण ७८२ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
  4. पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
  5. प्रस्तुत शुद्धिपत्रकास अनुसरून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील महाराष्ट्र कृषि सेवेकरीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल.
  6. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे; याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील.
  7. दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.