mazi नौकरी : महाराष्ट्र शासणा अंतर्गत जलसंधारण अधिकार्‍यांच्या ६७० रिक्त पदांसाठी मेगा भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि.१९/१२/२०२२ तसेच शासन शुध्दीपत्रक दि. १४/०७/२०२३ व दि.२०/०१/२०२३ कडील शासन पत्र संदर्भ क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल- २ दि. १९ / १२ / २०२२ अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० रिक्त पदांच्या भरती करिता मान्यता दिलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षणा नुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्ये नुसार सरळसेवेने रिक्त पदे भरती करिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणीक अर्हता व इतर अटींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारां कडून मृद व जलसंधारण विभागाच्या https:// swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जलसंधारण अधीकारी भरती

शैक्षणिक पात्रता : 

उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता
(शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब ( राजपत्रीत) सेवाप्रवेश नियम दिनांक २१ सप्टेंबर, २०२१)

निवड प्रक्रिया :

संगणक आधारीत (Computer Based Online Examination) परीक्षेचे स्वरुप.

जलसंधारण अधीकारी भरती

परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमद्धे दिलेला आहे .

नोकरीचे ठिकाण : NA

वयोमर्यादा : 

  • जाहिरातीत नमुद केलेल्या जलसंधारण अधीकारी गट ब (अराजपत्रीत) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १९ वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल ३८ वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापेक्षा) जास्त नसावे.
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षा पर्यंत
  • पात्र खेळाडुंच्या बाबतीत ४३ वर्षा पर्यंत
  • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षा पर्यंत

अर्ज फी : 

  • अमागास :- रु. १०००/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ / दिव्यांग :- रु. / ९००
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.

पगार : गट ब अधिकार्‍यांच्या निकषानुसार

अर्ज कसा भरावा :

  1. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
  2. पात्र उमेदवाराला वेब आधारीत (Web Based) ऑनलाईन अर्ज https://swed. maharashtra.gov. in या संकेत स्थळावर विहीत कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
  3. विहित पध्दतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्या शिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज परिक्षा शुल्क भरणे बंधकारक राहिल.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीव्दवारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यामातुन क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबंकिगव्दारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.

महत्वाच्या लिंक :

जलसंधारण अधिकारी अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 10/01/2024

इतर सूचना : 

  1. शासन निर्णय क्र. संकीर्ण / २००७ / पडताळणी / नवी / २६, दि. २१/११/२००७ अन्वये निवड झालेल्या उमेदवारां विरुध्द कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही अथवा सिध्द झालेला नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधीत पोलीस ठाण्याकडुन प्राप्त झाल्यानंतर त्याची / तिची सदर पदावर नेमणुक केली जाईल.
  2. महाराष्ट्र शासना कडुन आदेश क्र.एस.आर.व्ही.प्र.क्र.१७/२०००/२०१२ दि.०१/०७/२००५ नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.
  3. उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहीता, वाचता, बोलणे येणे आवश्यक आहे.
  4. नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराने विहीत केलेली इतर बंधपत्र / प्रतिज्ञापत्र / वचनपत्र / करारपत्र इत्यादी विशीष्ट स्वरुपात भरुन दिल्याशीवाय मृद व जलसंधारण विभागात रूजू करून घेतले जाणार नाही.
  5. शासकिय / निमशासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या संबंधीतनियुक्ती प्राधिकरणाच्या परवानगीने भरावयाचा आहे. अशी परवानगी प्राप्त केल्याची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
  6. उपरोक्त पदाकरिता शासकिय व निमशासकिय उमेदवाराने सरळ सेवा भरती प्रक्रियेत अर्ज सादर केल्यापासून निवड प्रक्रिया संपेपर्यंतच्या काळात घडणारे बदल, उदा. निलंबन, दंड, फौजदारी खटला, शस्तभंग विषयक अथवा तत्सम कारवाई इ. वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर घडून आलेले बदल न कळविल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  7. निवड झाल्यास उमेदवारास ५०० रूपयांच्या मुद्रांक पत्रावर नोटरी समोर आवेदन पत्रात नमुद अचुकते बाबत आणी सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्रात नियुक्तीपुर्वी सादर करावे लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.