पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी “क” पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
संवर्ग | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी ३ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक. |
निवड प्रक्रिया :
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येणार आहे, परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
- उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.
- शासन निर्णय प्रनिमं १२२२/ प्र. क्र. ५४/का. १३. अ दि. ४ मे २०२२ अन्वये गट-ब व गट-क मधील पदांसाठी मौखिक परीक्षा घेतल जाणार नाही.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
परीक्षेचे स्वरूप :
नोकरीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका
वयोमर्यादा :
अर्ज फी :
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु १०००/-
- मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु ९००/-
पगार : वेतन श्रेणी S- १ : ४, ३८६०० -१२२८००
अर्ज कसा भरावा :
- अर्जाची ऑनलाइन लिंक खाली दिलेली आहे
- अर्ज नोंदणी करण्यासाठी,”नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल.
- जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट”; टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा
जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : ०५/०२/२०२४, वेळ २३:५९ पर्यंत
सर्वसाधारण सूचना :
- प्राप्त अर्जांच्या संख्येचा विचार करून निवड प्रक्रियेचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त व मा. कर्मचारी निवड समिती यांना राहतील.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वत:च करणे आवश्यक आहे.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) वा अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या / पत्त्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
- एस.एस.सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रांवरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी.
- पत्रव्यवहारासाठी स्वत:चा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र / वर्ग
अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा / संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.