कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती ; 12 वी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज . जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | KDMC bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या  
वैद्यकीय अधिकारी(Medical Officer )67
बहुउददेशीय कर्मचारी (Male – MPW) 75

 

शैक्षणिक पात्रता : 

1. वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) : MBBS,Clinical experience inGovt. and/or private sector. And registration with MMC; MBBS उमेदवार नमिळाल्यास B.A.M.S. experience in Govt. and And registration with MCIM

2. बहुउददेशीय कर्मचारी (MPW) : 12 th Pass in Science + Paramedical Basic training course QR Sanitary Inspector Course

निवड प्रक्रिया : 

  1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.२.
  2. उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि. १७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १ : ३ व १ : ५ उमेदवारांची निवड गुणांकन पध्दतीने करण्यात येईल.उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी / पदविका परोक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.

वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) : MBBS पदांसाठी मुलाखत घेण्यात येईल. यासंबंधीची अधिक माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : आरोग्यवर्धिनी केंद्र HWC वेळ दु. २.०० ते रात्री १०.००

वयोमर्यादा : 

  • वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) : MMBS 70 वर्षे / BAMS 38 वर्षे
  • बहुउददेशीय कर्मचारी (MPW) : 38 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन :  

  • वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) – MMBS : 60,000
  • वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) – BAMS : 40,000
  • बहुउददेशीय कर्मचारी (MPW) : 18,000

अर्ज कसा भरावा : जाहिरातीमद्धे लिहिल्या प्रमाणे अर्ज खालील पत्यावर दिलेल्या वेळेत सादर करावा. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे. त्यासोबत जाहिरातीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे

  • वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) : दि. १२/०२/२०२४ रोजी वेळ – सकाळी १०.३० तेसायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • बहुउददेशीय कर्मचारी (MPW) : दि. १४ / ०२ / २०२४ रोजी वेळ – सकाळी १०.३० तेसायंकाळी ५.०० वाजेपर्यत

महत्वाच्या लिंक :

KDMC अधिसूचना जाहिरात 

इतर सूचना :

  1. सदर भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अधिकृत “संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
  2. जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
  3. जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित ठोक मानधन आहे.
  4. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग ( जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्रहय धरण्यात येणार नाही.
  5. राखीव संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या संवर्गाचे जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभही घेता येणार नाही.
  6. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  7. थेट मुलाखतीकरिता इच्छूक उमेदवारांनी फॉर्म सोबत खालील कागदपत्रे १ ते १६ जोडण्यात यावीत.
  8. गुणांकन यादी तयार केल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल. तसेच उमेदवारांचे गुणांकन व वय देखील समान असले तर अशा वेळी उमेदवाराचा संबंधित पदाशी निगडीत अनुभव जास्त असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.