महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-“अ” (एस-२०) या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी” या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी: सांविधानिक विद्यापिठाची एम. बी. बी. एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता.
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदासाठी: सांविधानिक विद्यापीठाची ( ४ . २ ) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किया द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.
- महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ ला जोडलेल्या भाग अ-१ अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली शुद्ध आयुर्वेद मधील पदवी किंवा बीएएमएस पदवी / पदव्युत्तर पदविका/पदव्युत्तर पदवी.
- ३१ जानेवारी, २०२४ या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास आंतरवासिता (Internship) पूर्ण असणारे व NMC/MMC नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवारच पात्र ठरतील. सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्दबातल ठरविण्यात येईल.
- भारता बाहेर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भारताची NBE परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील. तसेच अर्जाच्या छाननी साठी त्याचे NBE परीक्षेतील प्राप्त गुणच विचारात घेतले जातील. NBE परीक्षेचे गुणपत्रक अर्जासोबत न जोडल्यास त्यांचा अर्ज रद्दबातल ठरविण्यात येईल.
निवड प्रक्रिया : उमेदवारचे शिक्षण, गुण, अनुभव इ. निकषांच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल.
उमेदवारांना गुण देण्याची पध्दत :-
- पदवी परिक्षेच्या सर्व वर्षांमध्ये मिळालेले सरासरी गुण : ९५ टक्के
- परिच्छेद ९.४ मध्ये दर्शविलेल्या ५ टक्के सेवांकरीता अनुभवाचे गुण : ५ टक्के
या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण : आवश्यतेनुसार महाराष्ट्रात कुठेही
वयोमर्यादा :
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/–
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. ७००/-
वेतन : सातवा वेतन आयोग (वेतनस्तर, एस-२० रु.५६१००-१७७५००) नुसार वेतन अनुज्ञेय राहील.
अर्ज कसा भरावा : ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे. अर्ज भरताना खालील टप्पे असतील.
- General Information of Applicant,
- Details of Educational/Technical/Professional Course Information,
- Details of Experience Information,
- Select your Preferences of posting,
- Uploading of Documents / Certificates,
- Online Payment of Application Fees,
- Submit Online Application,
- Printing of Submitted Application,
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/02/2024
इतर सूचना :
- निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षाचा परिविक्षा कालावधी असेल.
- महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट-अ (सातवा वेतन आयोग, वेतनस्तर एस – २३, रू. ६७७००-२०८७००) या पदावर पदोन्नतीकरीता उमेदवारास संधी असून त्याकरीता त्या पदाकरीता आवश्यक असलेल्या अर्हता पूर्ण करणे आवश्यक राहील.
- निवड झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करता येणार नाही. परंतु त्यांनानियमानुसार व्यवसाय रोध भत्ता अनुज्ञेय राहील.
- निवड झालेल्या उमेदवाराने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजु होतांना संबंधित कार्यालय प्रमुखास “ते किमान ५ वर्षाची शासकीय सेवा करतील किंवा न केल्यास शासनाने वेळोवेळी विहीत केलेली रक्कम दंड म्हणून भरण्यास तयार आहेत” असे बंधपत्र देणे अनिवार्य असेल.
- सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दि. १९.०७. २०२३ मधील अटी व शर्तीनुसार सदर उमेदवारास कमीतकमी ३ वर्षाची नियमित सेवा (रजा कालावधी वगळून) झाल्याशिवाय सेवांतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी जाता येणार नाही.
- जर निवड होऊन रुजू झालेला उमेदवार उपरोक्त नमूद कालावधी आधी परस्पर पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्यास, त्यांच्या सेवा तात्काळ समाप्त कण्यात येतील.
- निवड झालेल्या उमेदवाराचे जाहिरातीच्या दिनांकास महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल अॅक्ट, १९६५ (महाराष्ट्र XLVI, १९६५) नुसार त्याचे / तिचे नांव नोंद असणे अनिवार्य आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.