बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन विभागातील (HR) ‘मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)’ (Human Resourse Coordinator) या संवर्गातील ३८ रिक्त पदे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून, ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरावयाची आहेत. मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदाच्या विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता धारण करीत असून पात्र आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्ष प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. - उमेदवार SAP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि Indian payroll मधील (Payroll Configuration, Running Payroll etc.) प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.
- उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- इतर पात्रता निकष विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया :
‘मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)’ या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार, विहित केलेली अर्हता व अटी /शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल.
परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल . परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेला आहे
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग : 1000/-
- मागासवर्गीय प्रवर्ग : 900/-
वेतन : स्तर एम १५ – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
अर्ज कसा भरावा :
- प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पध्दतीने स्विकारण्यात येतील. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- ऑनलाइन अर्जादारे चुकीची माहिती सादर करणा-या उमेदवारास, सदर परीक्षेसाठी व यापुढील सर्व निवडीकरिता अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवाराने ऑनलाइन परीक्षेकरीता विहित केलेले शुल्क ऑनलाइन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने आपला वैध ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर ई- मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाइन परीक्षेचा अंतिम निकाल लागेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- जर उमेदवाराने एकाच वेळी अर्ज पूर्णपणे भरला नाही तर भरलेली माहिती “SAVE AND NEXT” या टॅबचा वापर करून SAVE करता येईल. ऑनलाइन अर्ज SUBMIT करण्यापूर्वी उमेदवाराने SAVE AND NEXT या सुविधेचा वापर करून भरलेली माहिती तपासून पहावी व आवश्यकतेनुसार त्यामध्ये दुरुस्ती करावी. अंतिम SUBMIT करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य रितीने असल्याची खात्री करून घ्यावी.
- उमेदवाराने स्वतःचे/ वडिलांचे/पतीचे नाव तसेच नावांचे स्पेलिंग योग्यरित्या भरणे आवश्यक आहे. सदरची माहिती योग्य पध्दतीने न भरल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने भरलेली माहिती तपासण्यासाठी व SAVE करण्यासाठी “Validate your details” आणि “SAVE AND NEXT ” या बटनांचा वापर करावा.
पहावा. - ऑनलाइन अर्ज अंतिम SUBMIT करण्यापूर्वी Preview टॅबवर क्लिक करून संपूर्ण अर्ज तपासून
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/03/2024
इतर सूचना :
- यापूर्वी सादर केलेले/ प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्यादींचा अधिकार दिलेला नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
- सेवायोजन कार्यालय प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनीदेखील या जाहिरातीनुसार online अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
- मध्यस्थ/ठग/ मुंबई महानगरपालिकेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहेत.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.