सिडकोतर्फे सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील 101 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
- सॅप इआरपी (टीइआरपी – १०) प्रमाणपत्र.
निवड प्रक्रिया : वर नमूद पदासाठी उमेदवारांची निवड करताना २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणारअसून सदर परीक्षेकरीता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.
- चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
- लेखी परीक्षेमध्ये किमान ९० गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
नोकरीचे ठिकाण : संभाव्य ठिकाण – नवी मुंबई (या संबंधी अधिक माहिती किडको कडून देण्यात येईल.)
वयोमर्यादा : 38 वर्षे
अर्ज फी :
- राखीव प्रवर्ग – 900+ GST
- खुला प्रवर्ग – 1000+ GST
वेतन : श्रेणी एस-15 – 41800 – 1,32,300
अर्ज कसा भरावा :
- पात्रउमेदवारांनी सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदाच्या सरळसेवा भरतीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल.
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास https://cgrs.ibps.in/ या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्रमांक 1800222366 / 1800 1034566 वर अंतिम दिनांकाच्या आधी संपर्क साधावा.
- परीक्षेचे प्रवेश पत्र वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.
- पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
- भरती प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत आयडी नंबर तसेच पासवर्ड जतन करुन ठेवावा तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक / ई-मेल संदेश कायम ठेवावा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 20/02/2024
इतर सूचना :
- उमेदवारांनी शासन निर्णय क्रमांक-मातंस२०१२/ प्र.क्र. २७७/३९, दि. ०४.०२.२०१३ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार संगणकीय प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी शासन निर्णय सा.प्र.वि. क्रमांक प्रशिक्षण २००० / प्र.क्र.६१ / २००१ / ३९, दि. १९.०३.२००३ मधील तरतूदीनुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र त्यांच्या नियुक्तीच्या दिनाकांपासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शालांत परीक्षेशी समकक्ष ठरवलेली परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांस महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून / शासनाकडून अशा परीक्षेची समकक्षता पडताळणी करून घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.