राज्य सरकारच्या आरोग्य विभागात मेगा भरतीची घोषणा; 1729 वैद्यकीय अधिकारी पदे भरणार | MO bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-“अ” (एस-२०) या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी” या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात मेगा भरतीची घोषणा; 1729 वैद्यकीय अधिकारी पदे भरणार | MO bharti 2024

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात मेगा भरतीची घोषणा; 1729 वैद्यकीय अधिकारी पदे भरणार | MO bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी: सांविधानिक विद्यापिठाची एम. बी. बी. एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता.
  • वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदासाठी: सांविधानिक विद्यापीठाची ( ४ . २ ) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किया द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.
  • महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ ला जोडलेल्या भाग अ-१ अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली शुद्ध आयुर्वेद मधील पदवी किंवा बीएएमएस पदवी / पदव्युत्तर पदविका/पदव्युत्तर पदवी.
  • ३१ जानेवारी, २०२४ या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास आंतरवासिता (Internship) पूर्ण असणारे व NMC/MMC नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवारच पात्र ठरतील. सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्दबातल ठरविण्यात येईल.
  • भारता बाहेर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भारताची NBE परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील. तसेच अर्जाच्या छाननी साठी त्याचे NBE परीक्षेतील प्राप्त गुणच विचारात घेतले जातील. NBE परीक्षेचे गुणपत्रक अर्जासोबत न जोडल्यास त्यांचा अर्ज रद्दबातल ठरविण्यात येईल.

निवड प्रक्रिया : उमेदवारचे शिक्षण, गुण, अनुभव इ. निकषांच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल.

उमेदवारांना गुण देण्याची पध्दत :-

  • पदवी परिक्षेच्या सर्व वर्षांमध्ये मिळालेले सरासरी गुण : ९५ टक्के
  • परिच्छेद ९.४ मध्ये दर्शविलेल्या ५ टक्के सेवांकरीता अनुभवाचे गुण : ५ टक्के

या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : आवश्यतेनुसार महाराष्ट्रात कुठेही

वयोमर्यादा :

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात मेगा भरतीची घोषणा; 1729 वैद्यकीय अधिकारी पदे भरणार | MO bharti 2024

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/–
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. ७००/-

वेतन : सातवा वेतन आयोग (वेतनस्तर, एस-२० रु.५६१००-१७७५००) नुसार वेतन अनुज्ञेय राहील.

अर्ज कसा भरावा : ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे. अर्ज भरताना खालील टप्पे असतील.

  1. General Information of Applicant,
  2. Details of Educational/Technical/Professional Course Information,
  3. Details of Experience Information,
  4. Select your Preferences of posting,
  5. Uploading of Documents / Certificates,
  6. Online Payment of Application Fees,
  7. Submit Online Application,
  8. Printing of Submitted Application,

महत्वाच्या लिंक :

MO भरती अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/02/2024

इतर सूचना :

  1. निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षाचा परिविक्षा कालावधी असेल.
  2. महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट-अ (सातवा वेतन आयोग, वेतनस्तर एस – २३, रू. ६७७००-२०८७००) या पदावर पदोन्नतीकरीता उमेदवारास संधी असून त्याकरीता त्या पदाकरीता आवश्यक असलेल्या अर्हता पूर्ण करणे आवश्यक राहील.
  3. निवड झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करता येणार नाही. परंतु त्यांनानियमानुसार व्यवसाय रोध भत्ता अनुज्ञेय राहील.
  4. निवड झालेल्या उमेदवाराने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजु होतांना संबंधित कार्यालय प्रमुखास “ते किमान ५ वर्षाची शासकीय सेवा करतील किंवा न केल्यास शासनाने वेळोवेळी विहीत केलेली रक्कम दंड म्हणून भरण्यास तयार आहेत” असे बंधपत्र देणे अनिवार्य असेल.
  5. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दि. १९.०७. २०२३ मधील अटी व शर्तीनुसार सदर उमेदवारास कमीतकमी ३ वर्षाची नियमित सेवा (रजा कालावधी वगळून) झाल्याशिवाय सेवांतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी जाता येणार नाही.
  6. जर निवड होऊन रुजू झालेला उमेदवार उपरोक्त नमूद कालावधी आधी परस्पर पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्यास, त्यांच्या सेवा तात्काळ समाप्त कण्यात येतील.
  7. निवड झालेल्या उमेदवाराचे जाहिरातीच्या दिनांकास महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल अॅक्ट, १९६५ (महाराष्ट्र XLVI, १९६५) नुसार त्याचे / तिचे नांव नोंद असणे अनिवार्य आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.