कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याणच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली १२ विविध शाखेतील ३७ रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भराण्यात येणार आहेत. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
गट | पदाचे नाव | पदांची संख्या |
अ | उपअभियंता | 1 |
शाखा अभियंता | 1 | |
कनिष्ठ अभियंता | 1 | |
निरीक्षक | 1 | |
ब | सुपरवायझर | 1 |
व. लिपिक | 1 | |
क. लिपिक | 6 | |
वाहन चालक | 5 | |
क | शिपाई | 8 |
वॉचमन | 7 | |
साफसफाई कर्मचारी | 4 | |
माळी | 1 |
शैक्षणिक पात्रता : उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परिविक्षाधिन कालावधी, वेतन, समांतर आरक्षण, निवड पद्धती, अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत माहिती बाजार समितीच्या वेबसाइट वर 20 मार्च पासून उपलब्ध करण्यात येईल.
निवड प्रक्रिया : निवड शक्यतो ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल. या संबंधीची माहिती वेबसाइट वर देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : कल्याण
वयोमर्यादा : प्रलंबित
अर्ज फी : प्रलंबित
वेतन : प्रलंबित
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
(ऑनलाइन अर्जाची लिंक 20 मार्च पासून सुरू होईल)
अर्ज भरायची अंतिम तारीख : दि. २/४/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
इतर सूचना :
- ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही,
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता, स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
- प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.