सरकारच्या बेसिल कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदांसाठी भरती. | BECIL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL ही भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्याचे मुख्य क्षेत्र ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंट, औद्योगिक डिजाइन आणि परियोजना व्यवस्थापन आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांतर्गत सेवाएं पुरवते,

BECIL कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन1
फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह1
MDP रूम किपींग एक्झिक्युटिव्ह2
कॅटरिंग सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह1
अकांऊट असिस्टंट (HSK कॅटेगरी)1
डाटा एन्ट्री ऑपरेटर3

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग / IT डिप्लोमा / पदवी.
कमीतकमी २ वर्षांचा सबंधित कामाचा  अनुभव.
फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह१२ वी आणि फ्रंट ऑफिस मॅनेजमेंटचा डिप्लोमा किंवा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा.
कमीतकमी २ वर्षांचा संबंधित  कामाचा अनुभव.
MDP रूम किपींग एक्झिक्युटिव्ह१२ वी आणि हाऊस कीपींग ग्राज्युएट डिप्लोमा किंवा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा.
कमीतकमी २ वर्षांचा संबंधित  कामाचा अनुभव.
कॅटरिंग सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पदवी किंवा कॅटरिंग डिप्लोमा  किंवा समतुल्य पदवी.
संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव
अकांऊट असिस्टंट (HSK कॅटेगरी)M.com पदवी (१०+२+३+२)  किंवा MBA (फायनान्स) पदवी आणि संबंधित  कामाचा ३ वर्षांचा अनुभव
डाटा एन्ट्री ऑपरेटरमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संबंधित  कामाचा ३ वर्षांचा अनुभव

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : IIM जम्मू

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन35  वर्षे
फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह35  वर्षे
MDP रूम किपींग एक्झिक्युटिव्ह35  वर्षे
कॅटरिंग सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह35  वर्षे
अकांऊट असिस्टंट (HSK कॅटेगरी)35  वर्षे
डाटा एन्ट्री ऑपरेटर30  वर्षे

 

अर्ज फी :

  • एससी / एसटी / दिव्यांग / EWS  : 531
  • इतर प्रवर्ग : 885

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियनRs. 23,790/-
फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्हRs. 21,632/-
MDP रूम किपींग एक्झिक्युटिव्हRs. 21,632/-
कॅटरिंग सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्हRs. 21,632/-
अकांऊट असिस्टंट (HSK कॅटेगरी)Rs.35,000/
डाटा एन्ट्री ऑपरेटरRs.21,632/-

 

अर्ज कसा भरावा :

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. आदि संबंधित जाहिरात (जाहिरात क्र. 448) निवडा.
  3. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  4. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  5. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
  6. फॉर्मच्या शेवटी दिलेल्या ईमेल वर सर्व कागदपत्रे पाठवा.

महत्वाच्या लिंक :

BECIL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 8/5/2024

इतर सूचना : 

  1. नोकरीच्या विहित निकषांनुसार आणि आवश्यकतेनुसार निवड केली जाईल.
  2. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि ज्यांना समान/समान विभागात कामाचा अनुभव असेल.
  3. चाचणी/दस्तऐवज पडताळणी/वैयक्तिक संवाद/निवडीच्या कर्तव्यात सामील होण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. अर्ज फक्त वरील पोस्टसाठी ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे
  5. उमेदवारांना त्यांच्या कौशल्य चाचण्या/मुलाखत/संवाद आणि पुढील ऑन-साइट कामगिरी तपासणीसाठी ईमेल/टेलिफोनद्वारे सूचित केले जाईल.
  6. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्या अर्जाचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या माहितीमध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती BECIL स्वीकारणार नाही.
  7. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवा.
  8. अर्जदाराने सबमिट केलेल्या अर्जातील कोणत्याही टायपोग्राफिकल त्रुटींसाठी (उदा. ईमेल आयडी, मोबाईल नंबर इ.) BECIL जबाबदार राहणार नाही.
  9. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इत्यादींच्या दाव्याच्या समर्थनार्थ सर्व कागदपत्रे अपलोड करावी. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.