BARC (Bhabha Atomic Research Centre) हे भारतीय परमाणु अनुसंधान केंद्र आहे ज्यात विभिन्न शास्त्रज्ञान, प्रौद्योगिकी, अनुसंधान व अभियांत्रिकीच्या क्षेत्रात काम केले जाते. या संस्थेचे मुख्य काम अणु शक्ती विकास, प्रक्रिया विकास, वैज्ञानिक अनुसंधान, रासायनिक व अन्य प्रौद्योगिकी तंत्रज्ञानाची विकास आणि संचालन आहे.
BARC च्या रेडिएशन मेडिसिन सेंटर मध्ये वैज्ञानिक सहाय्यक (scientific assistant/C) पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
BARC Recruitment Qualification / BARC भरती शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी , मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स मधे किमान ६०% गुणांसह B.sc पदवी.
- संबंधित कामाचा किमान 4 वर्षांचा अनुभव.
- इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
BARC Recruitment Selection Procedure / BARC भरती निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
BARC Recruitment Place of Work / BARC भरती नोकरीचे ठिकाण :
कोल्लम, केरळ
BARC Recruitment Age limit / BARC भरती वयोमर्यादा :
१८ ते ३० वर्षे
BARC Recruitment Application fee / BARC भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / महिला : फी नाही
- इतर प्रवर्ग : १५०/-
BARC Recruitment Salary / BARC भरती वेतन :
44,900/- (७ व्या वेतन स्तर नुसार)
BARC Recruitment Application Procedure / BARC भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- रजिस्ट्रेशन झाल्यावर Apply Online वर क्लिक करा आणि जाहिरात 01/2024(R-I) निवडा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
BARC Recruitment Last Date / BARC भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
12/08/2024.
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- निवडलेल्या उमेदवारांद्वारे पार पाडल्या जाणाऱ्या कर्तव्यांच्या स्वरूपामध्ये चोवीस तास शिफ्टमध्ये काम करणे समाविष्ट आहे
- निवडलेले उमेदवार, त्यांच्या नियुक्तीवर, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातील.
- निवडलेल्या उमेदवारांना LLRRL, कोल्लम, केरळ येथे पोस्ट केले जाईल. ते भारतातील BARC च्या कोणत्याही युनिटमध्ये पोस्ट करण्यास देखील जबाबदार आहेत
- रिक्त पदे तात्पुरत्या आहेत आणि भिन्नतेच्या अधीन आहेत. BARC ने भरती प्रक्रिया रद्द/प्रतिबंधित/बदल/बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे,
- या जाहिरातीनुसार उमेदवार त्यांची शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक पात्रतेव्यतिरिक्त त्यांनी संपादन केलेला अनुभव जाहीर करू शकतात.
- उमेदवार हे सुनिश्चित करू शकतात की त्यांनी जाहिरात फॉर्ममध्ये नमूद केलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत आणि योग्य माहिती भरा
- उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइट तपासणे आवश्यक आहे. भरतीशी संबंधित सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. वेबसाइटवर प्रदर्शित केलेली माहिती ही उमेदवारांना दिलेली माहिती समजली जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.