UPSC मार्फत नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सेंट्रल आर्म पोलिस फोर्स (CAPF) मध्ये असिस्टंट कमांडंटच्या ५०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
विभाग | पदांची संख्या |
BSF | 186 |
CRPF | 120 |
CISF | 100 |
ITBP | 58 |
SSB | 42 |
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी..
- शारीरिक अहर्ता जाहिरातीमद्धे APPENDIX- V दिलेली आहे.
निवड प्रक्रिया :
- निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट द्वारे होईल. लेखी परीक्षेत पास झालेले उमेदवार फिजिकल टेस्ट साठी पात्र असतील.
- लेखी परीक्षेत २ पेपर असतील.
पेपर – I : जनरल ॲबीलिटी अँड इंटेलिजन्स (२५० गुण)
पेपर – II: जनरल स्टडीज , Essay अँड Comprehension (२०० गुन) - Physical Efficiency Test (PET) खालील प्रमाणे असेल.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही ,
वयोमर्यादा : 1/08/2024 रोजी 20 पेक्षा जास्त 25 वर्षांपेक्षा कमी असावे.
अर्ज फी :
- एससी / एसटी /महिला : फी नाही
- इतर प्रवर्ग : 200/-
वेतन : शासनाच्या नियमांनुसार असेल आणि इतर सुविधा आणि भत्ते देण्यात येतील.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- UPSC पोर्टल वर वन टाइम रजिस्ट्रेशन केले असल्यास डायरेक्ट फॉर्म भरू शकता.
- अन्यथा वेबसाईट वर जाऊन New Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
- सबंधित जाहिरात निवडून फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 14/05/2024
इतर सूचना :
- सहाय्यक कमांडंटच्या पदावर नियुक्तीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार पात्र आहेत.
- फक्त भारतीय अर्ज करू शकतात
- मूळ कागदपत्रांच्या संदर्भात पात्रता अटींची पडताळणी उमेदवार मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र झाल्यानंतरच घेतली जाते.
- उमेदवाराने अपलोड केलेले छायाचित्र ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून 10 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे
- परीक्षेसाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना वेळापत्रक आणि ठिकाण किंवा परीक्षेच्या ठिकाणांची माहिती दिली जाईल.
- एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा फी इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवली जाऊ शकत नाही.
- अपूर्ण किंवा सदोष अर्ज सरसकट नाकारले जातील. अशा नाकारण्याबाबत कोणतेही प्रतिनिधित्व किंवा पत्रव्यवहार कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतला जाणार नाही.
- या टप्प्यावर उमेदवारांना त्यांच्या अर्जांची हार्ड कॉपी आयोगाकडे सादर करण्याची आवश्यकता नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.