भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये गूड्स ट्रेन मॅनेजरच्या १०८ जागांसाठी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
- ईस्टर्न रेल्वे, मेट्रो रेल्वे आणि चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स काम करणारे रेग्युलर उमेदवार पात्र.
निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन टेस्ट (CBT) द्वारे होईल. त्यानंतर डॉक्युमेंट वेरीफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल.
नोकरीचे ठिकाण : पूर्व रेल्वेच्या विविध स्टेशन / कार्यालयात
वयोमर्यादा : ४२ वर्षे
अर्ज फी : NA
वेतन : लेवल 5 नुसार असेल (7th Pay CPC)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास 27/05/2024 पासून सुरवात होईल. )
अर्ज भरायची अंतिम तारीख : 25/06/2024
इतर सूचना :
- जे कर्मचारी अंतिम परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी अर्ज करण्याची गरज नाही.
- उमेदवार आवश्यक निकषांची पूर्तता करत नसल्याचे आढळल्यास RRC परीक्षा प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांचे अर्ज नाकारू शकते.
- अधिसूचित पोस्ट सुरक्षा श्रेणी पोस्ट आहे म्हणून PwBD कर्मचारी पात्र नाहीत
- अधिसूचित पदापेक्षा उच्च श्रेणीतील कर्मचारी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- जे कर्मचारी प्रशिक्षणार्थी/पर्यायी आहेत आणि नियमित केलेले नाहीत ते अर्ज करण्यास पात्र नाहीत
- कर्मचाऱ्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते विहित वैद्यकीय मानकांची पूर्तता करतात. जे कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य आढळतात त्यांना कोणतीही पर्यायी नियुक्ती दिली जाणार नाही.
- RRC ने ठरल्याप्रमाणे वेगवेगळ्या तारखा आणि ठिकाणी बॅचमध्ये परीक्षा आयोजित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.