माझी नोकरी : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; टेक्निशियन पदांसाठी भरती. | ECIL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ही कंपनी सरकाची सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम (ए युनिट) आहे.
ही कंपनी अणुऊर्जा विभागात नवीनतेवर भर देऊन धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच बरोबर आण्विक, संरक्षण, सुरक्षा, एरोस्पेस, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि ई-गव्हर्नन्स यात प्रगती करत आहे.

ECIL मध्ये विविध शाखेतील टेक्निशियन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक7
इलेक्ट्रिशियन6
मेकॅनिस्ट7
फिट्टर10

 

शैक्षणिक पात्रता :

  • अर्जदाराकडे मॅट्रिक/एसएससी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
  • संबंधित शाखेतून आयटीआय कोर्स आणि National Apprentice Certificate
  • किंवा संबंधित शाखेतून आयटीआय कोर्स 1 वर्षाचा अनुभव

निवड प्रक्रिया :

  1. निवड पद्धतीमध्ये दोन टप्प्यांची निवड प्रक्रिया असेल म्हणजे लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट . मुलाखत घेतली जाणार नाही.
  2. लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट यांचे वेटेज अनुक्रमे 85:15 असेल आणि एकूण 60% आहे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  3. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेवारांना ट्रेड टेस्ट साठी बोलवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : हैदराबाद किंवा देशभर कुठेही

वयोमर्यादा : 27 वर्षे

अर्ज फी :

  • एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 750

फी कशी भरायची ?

वेतन : Rs.20,480/ + पीएफ, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय लाभ, रजा इ. सुविधा देण्यात येतील.

अर्ज कसा भरावा :

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. वेबसाईट वर जाऊन 09/2024 ही जाहिरात सिलेक्ट करा.
  3. National Apprentice Certificate असेल तर NAC पर्याय निवडा अथवा अनुभव असल्यास exp पर्याय निवडा.
  4. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. पेमेंट केल्याचा SB Collect Reference No टाका.
  6. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  7. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा

महत्वाच्या लिंक :

ECIL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 13/04/2024

इतर सूचना : 

  1. फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
  2. निवडलेल्या उमेदवारांना कंपनीची सेवा देण्यासाठी भारतभरात कोणत्याही ठिकाणी पोस्ट केले जाऊ शकते.
  3. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, उमेदवारांना http://www.esil.co.in या लिंकला भेट देण्याचा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) विभाग पाहण्याचा सल्ला दिला जातो.
  4. सर्व पत्रव्यवहार अर्जदाराने ऑनलाइन अर्जात दिलेल्या ई-मेल आयडीद्वारेच केला जाईल. मेलिंग पत्ता/ईमेल आयडी/श्रेणी/पोस्ट आणि घोषित केलेल्या इतर माहितीमध्ये बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने कोणतेही कारण न देता भरती प्रक्रिया रद्द/प्रतिबंधित/विस्तारित/सुधारित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
  6. इंग्रजी व्यतिरिक्त इतर आवृत्तीमध्ये जाहिरातीचा अर्थ लावल्यामुळे कोणतीही संदिग्धता/विवाद झाल्यास, इंग्रजी आवृत्ती प्रचलित होईल.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने अपात्रता येईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.