नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भारतीय सैन्याकडून नुकितीक शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
सिव्हिल | 75 |
कॉम्प्युटर सायन्स | 60 |
इलेक्ट्रिकल | 33 |
इलेक्ट्रॉनिक्स | 64 |
मेकॅनिकल | 101 |
मिस्क इंजिनिअरिंग स्ट्रीम | 17 |
महिलांसाठी पदे | |
सिव्हिल | 7 |
कॉम्प्युटर सायन्स | 4 |
इलेक्ट्रिकल | 3 |
इलेक्ट्रॉनिक्स | 6 |
मेकॅनिकल | 9 |
Indian Army SSC Recruitment Qualification / आर्मी SSC भरती शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित इंजिनियरिंगच्या शाखेतून पदवी असणे आवश्यक. इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
Indian Army SSC Recruitment Selection Procedure / आर्मी SSC भरती निवड प्रक्रिया :
इंजिनियरिंगच्या गुणांच्या आधारावर कट ऑफ ठरवण्यात येईल आणि त्यानुसार उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे .
Indian Army SSC Recruitment Place of Work / आर्मी SSC भरती नोकरीचे ठिकाण :
ट्रेंनिंग पूर्ण झाल्यावर आवश्यकतेनुसार देशभर कुठेही भरती करण्यात येईल.
Indian Army SSC Recruitment Age limit / आर्मी SSC भरती वयोमर्यादा :
20 ते 27 वर्षे
Indian Army SSC Recruitment Application fee / आर्मी SSC भरती अर्ज फी :
फी नाही .
Indian Army SSC Recruitment Salary / आर्मी SSC भरती वेतन :
सुरवातीला वेतन स्तर लेवल 10 नुसार 56,100 – 1,77,500 असेल.
Indian Army SSC Recruitment Application Procedure / आर्मी SSC भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
Indian Army SSC Recruitment Last Date / आर्मी SSC भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
14/08/2024
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- वैद्यकीय मानके जाणून घेण्यासाठी कृपया www.joinindianarmy.nic.in ला भेट द्या आणि लष्करात अधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया लागू आहे.
- हे लक्षात घेण्यासारखे आहे की SSB मुलाखतीत केवळ पात्रता अंतिम निवडीची पुष्टी करत नाही
- मुलाखतीची तारीख/केंद्र बदलणे. एसएसबीइंटरव्ह्यूची तारीख/केंद्र बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही किंवा उत्तर दिले जाणार नाही.
- कोणतीही संदिग्धता/खोटी माहिती/प्रमाणपत्रे/दस्तऐवज/ऑनलाईन अर्जामध्ये आढळून आलेली माहिती लपविल्यास निवडीचा कोणताही टप्पा आणि त्यानंतर उमेदवारी रद्द केली जाईल.
- उमेदवाराला UPSC द्वारे कोणत्याही परीक्षेत बसण्यास कधीही प्रतिबंधित केले जाऊ नये.
- NDA, IMA, PCTA, नेव्हल अकादमी, Air ForceAcademyorany Service Training Academy मधून शिस्तभंगाच्या कारणास्तव माघार घेतलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.