IITM, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध असोसिएट व इतर 60 हून अधिक पदांसाठी भरती. | IITM Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) पुणे येथे स्थित आहे. ही संस्था हवामानशास्त्राच्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. हवामान, पर्यावरण आणि हवामान बदल यांसारख्या विविध विषयांवर संशोधन करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. IITM ही संस्था भारतीय हवामान खात्याच्या अंतर्गत येते आणि तिचे संशोधन हवामान पूर्वानुमान आणि हवामान बदलांच्या परिणामांवर केंद्रित आहे.

IITM, पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III4
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II11
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III4
ट्रेनिंग कोऑर्डीनेटर1
सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट2
प्रोजेक्ट – II8
प्रोजेक्ट असोसिएट – I33
रिसर्च असोसिएट (डीप ओशियन मिशन)2

 

शैक्षणिक पात्रता : पद निहाय शैक्षणिक व इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे..

निवड प्रक्रिया :

प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : IITM, पुणे

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III45  वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II40  वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III35  वर्षे
ट्रेनिंग कोऑर्डीनेटर40  वर्षे
सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट40  वर्षे
प्रोजेक्ट – II35  वर्षे
प्रोजेक्ट असोसिएट – I35  वर्षे
रिसर्च असोसिएट (डीप ओशियन मिशन)35  वर्षे

 

अर्ज फी : NA

वेतन : 

पदाचे नाव वेतन
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III₹78,000/- + HRA
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II₹ 67,000/- + HRA
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III₹ 56,000/- + HRA
ट्रेनिंग कोऑर्डीनेटर₹ 42,000/- + HRA
सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट₹ 42,000/- + HRA
प्रोजेक्ट – II₹ 35,000/- + HRA
प्रोजेक्ट असोसिएट – I₹31,000/- + HRA
रिसर्च असोसिएट (डीप ओशियन मिशन)₹ 58,000/- + HRA

 

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर संबंधित जाहिरातीसामोरील लिंक वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही, बायोडाटा आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

 IITM अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास 22 मे पासून सुरवात होईल)

अर्ज भरायची अंतिम तारीख : 18/06/2024

इतर सूचना : 

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले नाही त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  3. भारत सरकारच्या नियमांनुसार SC/ST/OBC/शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती/माजी सैनिकांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे.
  4. अनुभवाचा दावा वैध कागदपत्रांद्वारे समर्थित असावा.
  5. ऑनलाइन/ऑफलाइन मुलाखतीत उमेदवारांच्या स्क्रीनिंग केलेल्या कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल.
  6. निवडलेल्या उमेदवाराला वैद्यकीय प्राधिकरणाद्वारे योग्य असल्याचे आढळून आल्यावर त्यांना त्वरित या पदावर रुजू व्हावे लागेल.
  7. अत्यावश्यक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा अपवादात्मक प्रकरणांमध्ये नियुक्ती प्राधिकरणाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केली जाऊ शकते.
  8. डॉक्टरेट पदवी 3 वर्षांचा अनुभव म्हणून गणली जाईल (जर डॉक्टरेट पदवी आवश्यक पात्रता म्हणून नमूद केलेली नसेल).
  9. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. SC/ST उमेदवारांसाठी भारत सरकारच्या आदेशानुसार TA/DA ग्राह्य धरण्यात येईल.
  10. CGPA ग्रेडिंग टक्केवारीत रूपांतरित करायची आहे.
  11. प्रमाणपत्रांच्या स्कॅन प्रतींशिवाय सादर केलेला ऑनलाइन अर्ज नाकारला जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.