नोकरीच्या शोधात असणाऱ्या १० वी पास तरुण युवकांसाठी सुवर्णसंधी ; भारतीय नौदलाकडून अग्निविर 02/24 बॅच भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Agniveer MR शैक्षणिक व इतर पात्रता :
- स्त्री आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात,
- उमेदवार अविवाहित असावा.
- मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह १० वी पास असावा.
- या वर्षी १० वी ची परीक्षा दिलेले आणि ज्यांचा रिजल्ट अजून लागायचा आहे असे उमेदवारही पात्र असतील.
- कमीतकमी ऊंची १५७ सेंटिमिटर असावी.
Agniveer MR निवड प्रक्रिया :
निवड 2 टप्प्यात होईल ऑनलाइन परीक्षा आणि मेडिकल टेस्ट. ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
- प्रश्नपत्रिका संगणकावर आधारित असेल, एकूण ५० प्रश्न असतील, प्रत्येकाला ०१ गुण असतील.
- प्रश्नपत्रिका द्विभाषिक (हिंदी आणि इंग्रजी) आणि वस्तुनिष्ठ प्रकार (बहु-पर्यायी) असेल.
- प्रश्नपत्रिकेत विज्ञान, गणित आणि सामान्य जागरूकता या २ विभागांचा समावेश असेल.
- परीक्षेचा कालावधी ३० मिनिटांचा असेल.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशात किंवा देशभर कुठेही.
Agniveer MR वयोमर्यादा :
उमेदवारांचा जन्म 01 Nov 2003–30 Apr 2007 मधला असावा. (दोन्ही तारखा धरून)
अर्ज फी : 550/-
Agniveer MR वेतन :
वेतन स्वरूप खालील प्रमाणे असेल.
फिजिकल फिटनेस टेस्ट चे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन 02/2024 Batch सिलेक्ट क्लिक करा
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
(अर्ज स्वीकारण्यास 13 मे 2024 पासून सुरवात होईल. )
अर्ज भरायची अंतिम तारीख : 27 मे 2024
इतर सूचना :
- केवळ अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवार अग्निवीर म्हणून नावनोंदणीसाठी पात्र आहेत
- अग्निवीरांसाठी दरवर्षी ३० दिवसांची रजा लागू असेल.
- अग्निवीरला रु.चे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल. त्यांच्या प्रतिबद्धता कालावधीसाठी 48 लाख.
- .अग्निवीर माजी सैनिक दर्जासाठी पात्र असणार नाहीत.
- कोर्सचे प्रशिक्षण नोव्हेंबर 2024 मध्ये INS चिल्का, ओडिशा येथे सुरू होईल.
- उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करणे टाळावे. एखाद्या उमेदवाराकडून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- भरती संबंधी काही शंखा असल्यास 9499988785 या नंबर वर संपर्क साधावा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.