जर तुम्ही १० वी पास आणि आयटीआय कोर्स पूर्ण केला असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर. इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBPF) अंतर्गत विविध कॉंस्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या | एकूण | |
पुरुष | महिला | ||
कारपेंटर | 61 | 10 | 71 |
प्लंबर | 44 | 8 | 52 |
Mason (गवंडी) | 54 | 10 | 64 |
इलेक्ट्रिशियन | 14 | 1 | 15 |
ITBPF Constable Recruitment Qualification / ITBPF कॉंस्टेबल भरती शैक्षणिक पात्रता :
- नामांकित बोर्डातून १० वी पास
- संबंधित शाखेचा आयटीआय कोर्स पूर्ण.
ITBPF Constable Recruitment Selection Procedure / ITBPF कॉंस्टेबल भरती निवड प्रक्रिया :
- सर्व प्रथम शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PHYSICAL EFFICIENCY TEST ) घेण्यात येईल. त्याचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
- त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, लेखी चाचणी , कौशल्य चाचणी इ. घेण्यात येईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.
ITBPF Constable Recruitment Place of Work / ITBPF कॉंस्टेबल भरती नोकरीचे ठिकाण :
आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
ITBPF Constable Recruitment Age limit / ITBPF कॉंस्टेबल भरती वयोमर्यादा :
१८ ते २३ वर्षे
ITBPF Constable Recruitment Application fee / ITBPF कॉंस्टेबल भरती अर्ज फी :
फि नाही
ITBPF Constable Recruitment Salary / ITBPF कॉंस्टेबल भरती वेतन :
वेतन लेवल ३ नुसार Rs. 21,700 – 69,100 असेल ( ७ व्या वेतन आयोगानुसार )
ITBPF Constable Recruitment Application Procedure / ITBPF कॉंस्टेबल भरती अर्ज कसा भरावा :
- ITBPF कॉंस्टेबल भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन NEW USER REGISTRATION वर क्लिक करा आणि न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
ITBPF Constable Recruitment Last Date / ITBPF कॉंस्टेबल भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
१० सेप्टेंबर २०२४
महत्वाच्या लिंक :
ITBPF कॉंस्टेबल अधिसूचना जाहिरात
इतर सूचना :
- सरकारी नोकरांनी कागदपत्रांच्या वेळी त्यांच्या मालकाकडून मूळ “ना हरकत प्रमाणपत्र” सादर करावे अन्यथा त्यांची उमेदवारी नाकारली जाईल.
- ITBPF भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या कोणत्याही नुकसानी/दुखापतीसाठी जबाबदार राहणार नाही.
- ITBPF ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना वीज पडणे, इलेक्ट्रॉनिक, इंटरनेटशी संबंधित समस्या इत्यादीसाठी जबाबदार राहणार नाही.
- निवडलेल्या उमेदवारांना वेळोवेळी फोर्समध्ये विहित केलेले मूलभूत प्रशिक्षण आणि असे इतर अभ्यासक्रम घ्यावे लागतील.
- ज्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत अशा अपात्र उमेदवारांकडून कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- विषय भरती संदर्भात कोणतीही पुढील माहिती/सूचना केवळ https://recruitment.itbpolice.nic.in वर प्रकाशित केली जाईल. म्हणून, सर्व उमेदवारांना वेळोवेळी वरील लिंकवर लॉग इन करण्याचा सल्ला देण्यात येतो.
- उमेदवारांनी भर्ती केंद्रात त्यांच्या स्वत:च्या व्यवस्थेखाली एका दिवसापेक्षा जास्त मुक्कामासाठी रीतसर तयारी करून यावे.
- भरतीच्या ठिकाणापर्यंत आणि परतीच्या प्रवासासाठी कोणताही प्रवास भत्ता (TA)/ दैनिक भत्ता (DA) स्वीकारला जाणार नाही.
- अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
- श्रेणीतील बदल नंतरच्या टप्प्यावर ITBPF द्वारे स्वीकारले जाणार नाहीत आणि अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.