महावितरणमध्ये जूनियर असिस्टेंट, विद्युत सहाय्यक, ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) पदांच्या 6135 जागा भरण्यात येत असून. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०/०३/२०२४ अशी दिलेली होती. तथापि, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ देणेबाबत विनंती केली आहे. सबब, उक्त पदाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९/०४/२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
या भरती संबधीची संपूर्ण एकत्रित माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
जूनियर असिस्टेंट (अकाऊंट्स) | 468 |
विद्युत सहाय्यक | 5346 |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – डीस्ट्रीब्युशन | 281 |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – सिविल | 40 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जूनियर असिस्टेंट (अकाऊंट्स) | नामांकित विद्यापीठातून B.Com/ BMS/ BBA पदवी आणि सोबत MSCIT |
विद्युत सहाय्यक | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – डीस्ट्रीब्युशन | नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मध्ये पदवी. आणि संबंधित शाखेतील वर्ष 2021/23/23 च्या गेट परीक्षेतील वैध स्कोअर |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – सिविल | नामांकित विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवी. आणि संबंधित शाखेतील वर्ष 2021/23/23 च्या गेट परीक्षेतील वैध स्कोअर |
निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. पद निहाय निवड परीक्षेविषयीची माहिती जाहिरतीमद्धे दिलेली आहे.
जूनियर असिस्टेंट (अकाऊंट्स) / विद्युत सहाय्यक
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) : निवड गेट स्कोअर द्वारे होईल. संबंधित शाखेतील वर्ष 2021/23/23 च्या गेट परीक्षेतील व्यालीड स्कोअर असणे आवश्यक.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार महाराष्ट्रभर कुठेही.
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
जूनियर असिस्टेंट (अकाऊंट्स) | 30 वर्षे |
विद्युत सहाय्यक | 18 ते 27 वर्षे |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – डीस्ट्रीब्युशन | 35 वर्षे |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – सिविल | 35 वर्षे |
अर्ज फी :
जूनियर असिस्टेंट (अकाऊंट्स) / ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी)
- खुला प्रवर्ग : 500/-
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी : 250/-
विद्युत सहाय्यक
- खुला प्रवर्ग : 250/-
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी : 150/-
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
जूनियर असिस्टेंट (अकाऊंट्स) | 29,035 – 72,875 |
विद्युत सहाय्यक | 25,880 – 50,835 |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – डीस्ट्रीब्युशन | 49,210-1,19,315 |
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) – सिविल | 49,210-1,19,315 |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे. निवड IBPS द्वारे होणार आहे.
- वेबसाईट वर जाऊन Click here for New Registration वर क्लिक करा. तुमचं फोटो आणि सही उपलोड करा.
- इच्छुक असलेल्या पदाची जाहिरात सिलेक्ट करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
जूनियर असिस्टेंट अधिसूचना जाहिरात
विद्युत सहाय्यक अधिसूचना जाहिरात
ग्रॅजुएट इंजीनियर (ट्रेनी) अधिसूचना जाहिरात
अर्ज भरायची अंतिम तारीख : 19/04/2024
इतर सूचना :
- जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अर्हता ही ‘किमान’ अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरु शकणार नाही.
- उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे, याची उमेदवाराने नोंद घ्यावी. मराठी भाषेचे ज्ञान असलेबाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही
- भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवारांनी कोणत्याही मार्गे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.
- जाहिरातीतील पदांची भरती प्रक्रियेबाबतचा कंपनीचा निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळीवर कोणाशीही केला जाणार नाही.
- भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रचार/हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- मागासवर्गीयांनी खुल्या प्रवर्गाअंतर्गत अर्ज केला असल्यास तो नमूद केलेला विकल्प बदलता येणार नाही. संबंधित मागासवर्गीयांस सर्व बाबी खुल्या प्रवर्गाचा उमेदवार म्हणून समजण्यात येईल.
- प्रतिक्षा यादी कार्यान्वीत केल्यानंतरही जाहिरातीची पदे अथवा कंपनीमधील सदर पदाची रिक्त पदे शिल्लक राहिल्यास ती पदे कंपनीच्या निकडीनुसार पुढील भरती प्रक्रियेकरीता ओढण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक राहील.
- जाहिरातीत बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.