महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक ०६ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
राज्य सेवा परीक्षा | |
उप जिल्हाधिकारी, गट-अ | 7 |
सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ | 116 |
गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ | 52 |
) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ | 43 |
सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन), गट-अ | 3 |
उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ | 7 |
सहायक कामगार आयुक्त, गट अ | 2 |
सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट अ | 1 |
मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब | 19 |
सहायक गट विकास अधिकारी, गट-ब | 25 |
) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब | 1 |
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब | 5 |
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब | 7 |
सरकारी कामगार अधिकारी, गट ब | 4 |
हायक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी / संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / प्रबंधक, गट-ब | 4 |
उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब | 7 |
सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब | 52 |
निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब | 76 |
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल व वन विभाग | |
सहायक वनसंरक्षक, गट-अ | 32 |
वनक्षेत्रपाल, गट-ब | 16 |
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मृद व जल संधारण विभाग | |
उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ | 23 |
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब | 22 |
शैक्षणिक पात्रता :
राज्य सेवा परीक्षा 2024
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
- सांविधिक विद्यापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
- इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए)
- उद्योग उप संचालक, तांत्रिक, गट-अ
- सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
- विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
महाराष्ट्र वनसेवा :
- सहायक वनसंरक्षक पदाकरीता :
(अ) खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी :-
(१) वनस्पतीशास्त्र (२) रसायनशास्त्र (३) वनशास्त्र (४) भूशास्त्र (५) गणित (६) भौतिकशास्त्र (७) सांख्यिकी (८) प्राणिशास्त्र (९) उद्यानविद्या (१०) पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा
(ब) कृषि, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर
- वनक्षेत्रपाल पदाकरीता :-
- वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा
- विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
- विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०२/१५/प्र.क्र.४६/फ-४, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
- शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०९/१८/प्र.क्र.३६६/फ-४, दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील ( पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेवून उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग/पदासाठी पात्र असतील :-
(१) BE/B.Tech. Automobile Engineering, (२) BE/B.Tech. Power, (३) BE/B.Tech. Production, (४) BE/B.Tech. Metallurgy and Material, (५) BE/B.Tech. Textile, (६) BE- Information Technology, (७) BE- Instrumentation, (८) B.Sc.- Biotechnology, (९) B. Pharmacy, (१०) B.Tech. – Food Science - वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदांकरीता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद क्रमांक ७.४.२(२) मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्हता धारकामधून भरण्यात येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/ (४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेतः-
(अ) B.E./B. Tech. (Civil and Water Management)
(ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
(क) B.E./ B. Tech. (Structural)
(ड)B.E./B. Tech. (Construction Engineering/Technology
निवड प्रक्रिया : सुधारणा, आरक्षणासंदर्भातील शासनाचे प्रचलित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार महाराष्ट्रात कुठेही.
अर्ज फी :
- अमागास – रु. ५४४/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-
वेतन : शासनाच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- सर्वप्रथम खाते निर्माण करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- जिल्हा केंद्र निवड करणे.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 26 मे 2024 (23:59)
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.