माझी नोकरी : MPSC अंतर्गत विविध गट-अ पदांसाठी भरती. | MPSC Group A Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ या संवर्गातील एकूण २६ पदांच्या भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याला सुरवात झालेली नव्हती. सदर भरती पुन्हा सुरू झाली असून यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
माझी नोकरी : MPSC अंतर्गत विविध गट-अ पदांसाठी भरती. | MPSC Group A Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

mpsc group A

निवड प्रक्रिया : 

  • प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
  • जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
  • चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
  • चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
  • चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
  • प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया तत्कालिन समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि पर्यटन विभागातील समाज कल्याण अधिकारी, गट-अ (शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक-आस्थाप्र-२०२२/प्र.क्र.१२/आस्था-२, दिनांक २२ मार्च, २०२२ अन्वये पदनाम समाज कल्याण अधिकारी, वर्ग-१ सहायक आयुक्त, वर्ग-१ सहायक संचालक, वर्ग-१) (सेवाप्रवेश नियम) १९८० तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावली / कार्यपध्दतीनुसार राबविण्यात येईल.
  • अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणा-या उमेदवाराची क्रमवारी (Ranking) आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रभर कुठेही

वयोमर्यादा : 38 वर्षे (अ राखीव )

अर्ज फी : 

  • अराखीव (खुला) – रुपये ३९४/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये २९४/-

वेतन : वेतनश्रेणी/स्तर – एस-१८ रुपये ४९,१००/- ते रुपये १,५५,८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

अर्ज कसा भरावा : 

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
  3. खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

महत्वाच्या लिंक :

MPSC ग्रुप A अधिसूचना जाहिरात 

सुधारित जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास 27 मे पासून सुरवात होईल )

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिनांक १० जून, २०२४ रोजी २३.५९

इतर सूचना :

  1. भरावयाच्या उपरोक्त संवर्ग / पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
  2. शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती / बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. ६.३ विविध मागास प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.
  3. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक-महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२, दिनांक ०४ मे, २०२३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
  4. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.
  5. महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवगातील महिलांसाठी नॉन- क्रीमीलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
  6. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.
  7. दिव्यांग व्यक्तींची संबंधित संवर्ग/पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
  8. दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
  9. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी / सवलतीसाठी पात्र असतील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.