majhi naukri : राष्ट्रीय जलविज्ञान संस्थानात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NIH Roorkee Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

राष्ट्रीय जलविज्ञान संस्था (National Institute of Hydrology – NIH) ही भारतातील एक प्रमुख संशोधन संस्था आहे जी जलसंपत्तीच्या क्षेत्रातील समस्यांवर संशोधन करते. ही संस्था जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व विकास कार्य करते. जलसंपत्तीचे मूल्यांकन, संवर्धन, व्यवस्थापन, आणि जलविज्ञानाच्या विविध विषयांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्याचे कार्य NIH करते.

NIH देशातील विविध केंद्रामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
सिनिअर रिसर्च असिस्टंट3
टेक्निशियन ग्रेड – III3
लोअर डिविजन क्लार्क5
स्टाफ कार ड्रायव्हर2

 

National Institute of Hydrology Recruitment Qualification / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिनिअर रिसर्च असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधे पदवी. किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा संगणक ऍप्लिकेशनसह बॅचलर पदवी संपादन केल्यानंतर, भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/गणित/जलविज्ञान/संगणक ऍप्लिकेशन्स/पृथ्वी विज्ञान मधे पदव्युत्तर
टेक्निशियन ग्रेड – III10 वी पास आणि सबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित शाखतून ITI पूर्ण आणि 3 वर्षांचा अनुभव किंवा अप्रेंटिस पूर्ण आणि 2 वर्षांचा अनुभव.
लोअर डिविजन क्लार्क12 वी पास आणि 35 wpm इंग्लिश टायपिंग स्पीड आणि 30 wpm हिंदी टायपिंग स्पीड.
स्टाफ कार ड्रायव्हर8 वी पास आणि वैद ड्रायव्हिंग लायसन्स. गाड्यांच्या रीपेरिंग चे थोडे फार ज्ञान असणे आवश्यक आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

National Institute of Hydrology Recruitment Selection Procedure / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती निवड प्रक्रिया : 

प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

National Institute of Hydrology Recruitment Place of Work / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती नोकरीचे ठिकाण : 

बेलगावी, रुरकी, गुवाहाटी,, पाटणा, काकीनाडा, जम्मू, भोपाळ आणि जोधपूर किंवा देशाचा कोणतेही अन्य ठिकाण.

National Institute of Hydrology Recruitment Age limit / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती वयोमर्यादा : 
पदाचे नाववयोमर्यादा
सिनिअर रिसर्च असिस्टंट30  वर्षे
टेक्निशियन ग्रेड – III18-27  वर्षे
लोअर डिविजन क्लार्क18-27  वर्षे
स्टाफ कार ड्रायव्हर25  वर्षे
National Institute of Hydrology Recruitment Application fee / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 100
    100 Rs (फि DD च्या स्वरुपात भरावी DD  – in favour of National Institute of
    Hydrology, Roorkee payable at Roorkee)
National Institute of Hydrology Recruitment Salary / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
सिनिअर रिसर्च असिस्टंटRs.44900-
142400
टेक्निशियन ग्रेड – IIIRs.21700-
69100
लोअर डिविजन क्लार्कRs.19900-
63200
स्टाफ कार ड्रायव्हरRs.19900-
63200
National Institute of Hydrology Recruitment Application Procedure / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती अर्ज कसा भरावा : 
  • नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अधिसूचनेनुसार अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे,
  • अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे (सर्व स्व-प्रमाणित आधार/संबंधित कागदपत्रे, डिमांड ड्राफ्ट आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो) जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : Sr. Admin officer NIH, Jal Vigyan Bhawan, Roorkee. 247 667
National Institute of Hydrology Recruitment Last Date / राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

१७ सेप्टेंबर २०२४

महत्वाच्या लिंक : 

NIH अधिसूचना जाहिरात 

फॉर्म ची लिंक 

इतर सूचना : 
  1. जाहिरात केलेली कोणतीही किंवा सर्व पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे.
  2. सदस्यता घेतलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उच्च पात्रता असलेल्या परंतु विहित पात्रता नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  3. अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेला कमाल वयोमर्यादेचा विचार केला जाईल.
  4. जाहिरात केलेल्या पोस्ट्सच्या प्रतिसादानुसार पात्र उमेदवारांना लेखी चाचणी/कौशल्य चाचणीसाठी बोलावण्याचे निकष प्रतिबंधित/बदलण्यासाठी संस्था स्वतंत्र आहे.
  5. NIH अंतिम तारखेपूर्वी प्राप्त झालेले सर्व अर्ज तपासेल. लेखी चाचणी/मुलाखतीसाठी फक्त उमेदवारांनाच आमंत्रित केले जाईल.
  6. ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अनुभव/आवश्यक पात्रता आणि वयाची गणना केली जाईल.
  7. अपूर्ण अर्ज किंवा सर्व संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींशिवाय (शैक्षणिक आणि अनुभव दोन्ही) किंवा शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.