सरकारच्या NHPC कंपनीत नोकरीची संधी; अप्रेंटीस अंतर्गत विविध शाखांतील 64 पदांसाठी भरती. | NHPC Recruitment 2024 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

1975 मध्ये स्थापन झालेली NHPC लिमिटेड ही भारत सरकारची ‘मिनी रत्न’ श्रेणी-I दर्जा असलेली अनुसूची –A, कंपनी आहे. NHPC ही अभियांत्रिकी प्रवीणता आणि कौशल्य यात अग्रगण्य स्थानावर आहे.  भारत आणि शेजारील देशांमधील जलविद्युत विकास प्रकल्प राबवत आहे .

NHPC मध्ये अप्रेंटीस अंतर्गत विविध शाखांतील 64 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
COPA12
वेल्डर3
स्टेनोग्राफर & सेक्रेटरिअल असिस्टंट10
प्लंबर2
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक5
इलेक्ट्रिशियन15
फिटर5
मेकॅनिक (MV)5
वायरमन2
टर्नर2
मेकॅनिस्ट3

 

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास.
  • संबंधित शाखेतून आयटीआय ,  ज्यांचा रिजल्ट यायचा आहे त्यांनी अप्लाय करू नये.

निवड प्रक्रिया : आयटीआय मध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : NHPC, Champawat

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : दर महा 7000-8000 स्टीपेंड देण्यात येईल. (संभाव्य)

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज पाठवण्याआधी उमेदवारांनी  www.apprenticeshipindia.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि Establishment ID: E05200500184 या आयडी द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती साठी अप्लाय करावे.
  • त्यानंतर अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.  अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • पत्ता : Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, Pin-262310

महत्वाच्या लिंक :

NHPC अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 30.05.2024 (अर्ज दिलेल्या पत्त्यावर 10/6/2024 च्या आदी पोहचणे आवश्यक)

इतर सूचना : 

  1. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल आणि करार असेल
    शिकाऊ प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपोआप संपुष्टात येईल.
  2. या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराने अटी व शर्तींचे पालन केले पाहिजे.
  3. गुणवत्ता यादी तयार करताना दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, त्याहून अधिक वयाच्या उमेदवाराचा विचार केला जाईल.
  4. ज्या उमेदवारांनी आधीच शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे, त्यांनी अर्ज करू नये
  5. कोणतीही संदिग्धता/विवाद, इंग्रजी व्यतिरिक्त इतर आवृत्तीमधील अर्थ लावल्यामुळे उद्भवल्यास, इंग्रजी आवृत्ती प्रचलित होईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.