Mazi Nokari : IBPS क्लार्क भरतीची घोषणा; विविध सरकारी बँकांमध्ये ६१२८ पदांसाठी मेगा भरती | IBPS Clerk Exam 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

पदवीधरांसाठी सुवर्ण संधी..! IBPS कडून नुकतीच IBPS Clerk Exam 2024 परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी देशातील विविध 11 सरकारी बँकांमध्ये 6128 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.,

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आणि त्या संबंधीचा कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक.
  • स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया : परीक्षा 2 टप्प्यात होईल. Preliminary Examination आणि Main Examination दोन्ही परीक्षा बहुपर्यायी असतील. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

IBPS Preliminary Examination 2024 format 

Preliminary Examination 2024 Exam फॉर्मात

IBPS Mains Examination 2024 format 

IBPS Mains Examination 2024 format 

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रातील जागांची संख्या खालील प्रमाणे असेल.

IBPS Clerk maharashtra seat

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे

अर्ज फी : 

  • SC/ST/PwBD/ESM/DESM : 175/-
  • इतर : 850/-

वेतन : सुरवातीला वेतन ₹28,000–₹30,000 असेल. (संभाव्य)

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

IBPS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 21/07/2024

भारतीचे संभाव्य वेळापत्रक खलील प्रमाणे असेल.

IBPS Clerk 2024 Schedule

इतर सूचना : 

  1. ऑनलाइन प्राथमिक परीक्षेदरम्यान कॉल लेटर आणि फोटो आयडी पुराव्याची प्रत परीक्षेच्या ठिकाणी गोळा केली जाणार नाही.
  2. जे उमेदवार ऑनलाइन पूर्वपरीक्षेचे ऑथेंटिकेटेड/स्टँम्प केलेले कॉल लेटर आणि मुख्य परीक्षेच्या वेळी आयडी प्रूफची ऑथेंटिकेटेड/स्टॅम्प्ड फोटोकॉपी आणणार नाहीत त्यांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  3. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने या अधिसूचनेमध्ये नमूद केलेली पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
  4. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत.
  5. एकदा नोंदणीकृत ऑनलाइन अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि/किंवा अर्ज शुल्क/सूचना शुल्क भरल्यानंतर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही.
  6. भरती प्रक्रियेसह या अधिसूचनेमुळे उद्भवणारे कोणतेही परिणामी विवाद मुंबई येथील न्यायालयांच्या एकमेव अधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.
  7. उमेदवाराने ऑनलाइन अर्जामध्ये तो/ती ज्या राज्याला निवडीवर तात्पुरत्या वाटपाचा पर्याय निवडतो ते सूचित करावे. एकदा वापरलेला पर्याय अपरिवर्तनीय असेल.
  8. कोणताही प्रचार करणे किंवा अनुचित फायद्यासाठी प्रभाव निर्माण करणे निवड प्रक्रियेतून अपात्र ठरेल.
  9. ऑनलाइन परीक्षेसाठी (प्राथमिक आणि मुख्य) तारीख, वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  10. पत्ता बदलण्याची कोणतीही विनंती, ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या तपशीलांवर विचार केला जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.