वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय । दंत । आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीवी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
अर्ज भरायची अंतिम तारीख : 20/01/2024
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
निवड प्रक्रिया :
या भरती मधे निवड ऑनलाईन टेस्ट द्वारे होणार आहे.
परीक्षेचे स्वरूप
- मराठी : प्रश्न २५/गुण ५०
- इंग्रजी : प्रश्न २५/गुण ५०
- सामान्य ज्ञान : प्रश्न २५/गुण ५०
- बौद्धिक चाचणी / अंक गणित : प्रश्न २५/गुण ५०
- एकूण गुण : प्रश्न १००/ गुण २००
परीक्षा कालावधी : २ तास
नोकरीचे ठिकाण : नागपूर जिल्ह्यातील शासकीय विद्यालये व संलग्न रुग्णालये
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (खुला गट)
इतर वर्गांसाठीच्या वयोमर्यादे साठी जाहिरात वाचा.
अर्ज फी :
खुला प्रवर्ग : १०००
राखीव गट : ९००
पगार : १५०००-४७६०० + महागाई भत्ता व इता भत्ते
अर्ज कसा भरावा :
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील
- उमेदवारास फक्त एकच अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या संस्थे करीता वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत, एका पेक्षा जास्त संस्थे करीता अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
- अर्ज सादर करण्या करीता संकेतस्थळ :- https://gmcnagpur.org
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://gmcnagpur.org या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्या शिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही
- अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणका मार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी
- उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
महत्वाच्या लिंक :
नागपुर वैद्यकीय महविद्यालय भरती अधिसूचना जाहिरात
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.