पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित खालील पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.
पदाचे नाव | पदांची संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 67 |
स्टाफनर्स | 67 |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) | 67 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | १) एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक २) इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक ३) एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील. ४) अनुभव- Medical Council Registration झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य |
स्टाफनर्स | १) १२ वी उत्तीर्ण आवश्यक, २) जी.एन. एम. किंवा बी. एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक. ३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. ४) स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) | १) १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक, २) Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीण असणे आवश्यक ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया :
- जाहिरातीमधील वैद्यकीय अधिकारी या पदे भरण्याकरिता सदर जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या Marking Pattern नुसार गुणांकन पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.
- जाहिरातीमधील स्टाफनर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या पदांची गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविली जाईल.
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. – ६०,०००/- प्रतिमहा व बी.ए.एम.एस- २५०००/- मानधन + १५,०००/- कामावर आधारीत मोबदला (पीबीआय). |
स्टाफनर्स | २०,०००/- प्रतिमहा |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) | १८,०००/- प्रतिमहा |
अर्ज कसा भरावा :
अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
इच्छुक उमेदवारांनी दि.१२/०६/२०२४ ते दि.२१/०६/२०२४ रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी- ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक- जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा. वरील कालावधीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
तसेच सदर जाहिरातमधील रिक्त राहणा-या फक्त वैद्यकीय अधिकारी या पदाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष पिंपरी- ४११ ०१८ येथे आठवडयातील दर बुधवारी सकाळी-१०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : दि.२१/०६/२०२४
इतर सूचना :
- सदरची नियुक्ती पुर्णपणे तात्पुरत्या (हंगामी) स्वरुपाची आहे. त्यामुळे अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही ज्या दिवशी सोसायटीस सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय मानधनावरील सेवा समाप्त केली जाईल.
- सदरच्या जाहिरामधील पदांच्या संख्येमध्ये अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शरीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- कौन्सिलकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीतील असणे आवश्यक आहे.
- सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगीत करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखुन ठेवलेले आहेत.
- अनुभवाच्या बाबतीत शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य व खाजगी संस्था यांचा अनुभव ग्राहय धरण्यात येईल
- उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा.
- सदर पदभरती अंतर्गत निवड करण्यात येणा-या उमेदवारांकडून सदरचे पदावर कायमस्वरुपी हक्क सांगणार नसलेबाबत र.रु.१०० चे स्टॅम्प पेपरवर बंधपत्र भरुन देणे बंधनकारक राहील.
- सदर जाहिरातीमधील नमूद पदांची निवड समिती मार्फत निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.