मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
स्वयंपाकी | २ |
ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) | ८ |
Bombay high court Recruitment Qualification / मुंबई उच्च न्यायालय भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्वयंपाकी | १. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा. २. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. |
ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) | (a) उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी, मराठी या भाषांमध्ये पदवी धारण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी धारक असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल; (b) उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी आणि किमान खालीलपैकी कोणतीही एक हिंदी किंवा कोकणी भाषा प्रवीण असावी. क) उमेदवाराकडे संगणकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
Bombay highcourt Recruitment Selection Procedure / मुंबई उच्च न्यायालय भरती निवड प्रक्रिया :
स्वयंपाकी :
आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प-सुची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
अ.क्र. | मूल्यांकन पद्धती | गुण |
१ | स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा (उत्तीर्ण गुण किमान १५) | ३० |
२ | शारीरिक कार्यक्षमता चाचणी | १० |
३ | तोंडी मुलाखत | १० |
४ | निवड प्रक्रियेचे एकूण गुण | ५० |
ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी):
पात्र निवडलेल्या उमेदवारांना 100 गुणांची स्क्रीनिंग चाचणी द्यावी लागेल, चाचणीचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
Part-I
Part – II
तोंडी परीक्षा (२० गुण)
Bombay highcourt Recruitment Place of Work / मुंबई उच्च न्यायालय भरती नोकरीचे ठिकाण :
मुंबई
Bombay highcourt Recruitment Age limit / मुंबई उच्च न्यायालय भरती वयोमर्यादा :
१८ ते ३८ वर्षे
Bombay highcourt Recruitment Application fee / मुंबई उच्च न्यायालय भरती अर्ज फी :
पदाचे नाव | फी |
स्वयंपाकी | ३००/- (डीडी) |
ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) | ५०/- |
Bombay highcourt Recruitment Salary / मुंबई उच्च न्यायालय भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
स्वयंपाकी | एस ३ ११६,६०० – ५२,४००/- |
ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) | एस – १८ : ₹ ४९,१०० – १,५५,,८००/- |
Bombay highcourt Recruitment Application Procedure / मुंबई उच्च न्यायालय भरती अर्ज कसा भरावा :
स्वयंपाकी :
निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ‘इ’ मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे / पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादींसह परिशिष्ट ‘अ’ नमुन्यानुसार, – दिनांक १६/०८/२०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यत किंवा त्या आधी पोहचेल या बेताने खालील पत्यावर फक्त स्पीड पोस्टाव्दारे (speed post) पाठवावेत :-
प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४००००१.
ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
Bombay highcourt Recruitment Last Date / मुंबई उच्च न्यायालय भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
१५/०८/२०२४
महत्वाच्या लिंक :
ज्युनिअर ट्रांसलेटर अधिसूचना जाहिरात
ज्युनिअर ट्रांसलेटर ऑनलाइन अर्जाची लिंक
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधितMumbai कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.