राज्यशासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  | DTPMS Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
रचना सहाय्यक२६१
उच्चश्रेणी लघुलेखक
निम्नश्रेणी लघुलेखक१९
DTPMS Recruitment Qualification / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रचना सहाय्यकस्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक
उच्चश्रेणी लघुलेखकमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि,
लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अर्हता धारण करणे आवश्यक.
निम्नश्रेणी लघुलेखकमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि,
लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अर्हता धारण करणे आवश्यक.
 
DTPMS Recruitment Selection Procedure / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती निवड प्रक्रिया : 

रचना सहायक सवंर्गासाठी ऑनलाईन परीक्षा एकूण २०० गुणांची (प्रत्येकी २ गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे १०० प्रश्न) घेतली जाईल. त्यापैकी तांत्रिक प्रश्नांसाठी ८० गुण व मराठी + इंग्रजी + सामान्यज्ञान + बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास ३० गुण याप्रमाणे १२० गुणांची (असे एकुण २०० गुणांची) परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षा ही रचना सहायक पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व २ तासांची असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची असेल. बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा. समान गुण मिळालेल्या उमेदवारांबाबत शासनाने निर्गत केलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. तसेच, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकुण गुणांच्या किमान ४५% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून शिफारस / निवडसूची तयार करण्यात येईल.

उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक संवर्गासाठी ऑनलाईन परीक्षा एकूण १२० गुणांची (प्रत्येकी २ गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे ६० प्रश्न) घेतली जाईल. त्यापैकी मराठी इंग्रजी सामान्यज्ञान बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास ३० गुण याप्रमाणे १२० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षा ही उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व ९० मिनिटांची असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची असेल. बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा. समान गुण मिळालेल्या उमेदवारांबाबत शासनाने निर्गत केलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. तथापि, जे उमेदवार परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील, अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल. व्यावसायिक चाचणी वेळापत्रकाबाबत अशा पात्र उमेदवारांना स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. तसेच, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा व व्यवसायिक चाचणी यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे शिफारस/निवडसूची तयार करुन शिफारस / निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमद्धे दिलेला आहे.

रेल्वे तर्फे पॅरा मेडिकल भरतीची घोषणा ; नर्सिंग तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील १००० हून अधिक जागांसाठी भरती 
DTPMS Recruitment Place of Work / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार राज्यात कुठेही.

DTPMS Recruitment Age limit / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती वयोमर्यादा : 

१८ ते ३८ वर्षे

DTPMS Recruitment Application fee / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती अर्ज फी : 
  • खुला प्रवर्ग : १०००/-
  • राखीव प्रवर्ग : ९००/-
DTPMS Recruitment Salary / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
रचना सहाय्यकएस-१४. रु.३८६००-१२२८००/-
उच्चश्रेणी लघुलेखकएस-१५, रु.४१८००-१३२३००/-
निम्नश्रेणी लघुलेखकएस-१४, रु.३८६००-१२२८००/-
DTPMS Recruitment Application Procedure / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती अर्ज कसा भरावा :
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन “New Registration” वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
DTPMS Recruitment Last Date / नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

29th August 2024 – 11:55 PM

महत्वाच्या लिंक :

DTPMS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. रचना सहायक / उच्चश्रेणी लघुलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोकण-१ / कोकण-२ / नाशिक / पुणे / छत्रपती संभाजीनगर / अमरावती / नागपूर विभागात नियुक्ती देण्यात येईल.
  2. अर्ज केल्यानंतर पुढील निवड प्रक्रियेला विशिष्ट कालावधी लागणार असल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याबाबत नगर रचना संचालनालयाकडे अथवा त्यांचे अधिनस्त कार्यालयांकडे कुठलीही चौकशी (मौखिक अथवा लेखी) किंवा दूरध्वनी करु नये.
  3. रचना सहायक पदांवर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यात नगर रचना संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात तसेच महानगरपालिका / नगरपरिषदा / नगरपंचायती / विकास प्राधिकरणे / नवनगर विकास प्राधिकरणे / प्रदेश विकास प्राधिकरणे / शासनाची संबंधित इतर प्राधिकरणे / कार्यालये यापैकी कोठेही नियुक्ती / बदली होऊ शकेल.
  4. अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे अर्जदारास परीक्षेस बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे, असे असणार नाही. शिफारशीच्या / निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे आढळल्यास, खोटी कागदपत्रे दिल्याचे आढळल्यास, त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्दबादल होईल.
  5. निवड प्रक्रीयेसंदर्भात शासन / न्यायालयाचे निर्णय सर्व उमेदवारांवर बंधनकारक राहातील. कोणत्याही अपरिहार्य ५ कारणास्तव भरती / शिफारस / निवड प्रक्रीया स्थगित / रद्द करण्याचे अधिकार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी / राज्य निवड समितीने राखून ठेवले आहेत.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.