माझी नोकरी : वसई विरार मनपात नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात मेगा भरती.  | VVCMC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत अहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी खुश खबर आहे. वसई विरार महानगर पालिकेतर्फे आरोग्य विभागात मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या 
बालरोग तज्ञ2
साथरोग तज्ञ1
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी१०
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एम.बी.बी.एस.
60
स्टाफ नर्स
(GNM)
(स्त्री)
48
बहुउद्देशीय
आरोग्य सेवक
(पुरुष)
56
VVCMC Recruitment Qualification / वसई विरार मनपा भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
बालरोग तज्ञMD Paed/ DCH/DNB MMC Reg
साथरोग तज्ञAny Medical Graduate (MBBS/BDS/ AYUSH etc.) With MPH/MHA MBA in Health
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS with MCI Registration/ MMC Registration
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एम.बी.बी.एस.
MBBS / BAMS with MCI Registration
स्टाफ नर्स
(GNM)
(स्त्री)
GNM/Bsc Nursing
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
बहुउद्देशीय
आरोग्य सेवक
(पुरुष)
१) १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक.
२) Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक.
३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

VVCMC Recruitment Selection Procedure / वसई विरार मनपा भरती निवड प्रक्रिया : 
  1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार/गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकार मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
  2. उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या दि.१७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १:३ व १:५ उमेदवारांची निवड गुणांकन पध्दतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/ पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालीलप्रमाणे करण्यात येईल.

१) थेट मुलाखती – अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.
१) Subject Knowledge (१०)
२) Research & Academic Knowledge (१०)
३) Leadership Quality (१०)
४) Administrative Abilities (१०)
५) Experience (१०)
a) For Govt. Experience- २ marks for one year
b) For Private Experience- १ marks for one year ६) Total Experience – १० marks Maximum.
एकूण गुण- ५०

२) गुणांकन पध्दती – उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवावी.

VVCMC Recruitment

VVCMC Recruitment Place of Work / वसई विरार मनपा भरती नोकरीचे ठिकाण : 

वसई विरार मनपा क्षेत्र

VVCMC Recruitment Age limit / वसई विरार मनपा भरती वयोमर्यादा : 
पदाचे नाव वयोमर्यादा
बालरोग तज्ञ70  वर्षे
साथरोग तज्ञ70  वर्षे
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी70  वर्षे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एम.बी.बी.एस.
38 – 70  वर्षे
स्टाफ नर्स
(GNM)
(स्त्री)
65  वर्षे
बहुउद्देशीय
आरोग्य सेवक
(पुरुष)
38  वर्षे
VVCMC Recruitment Application fee / वसई विरार मनपा भरती अर्ज फी : 

फी नाही

VVCMC Recruitment Salary / वसई विरार मनपा भरती वेतन : 
पदाचे नाव वेतन 
बालरोग तज्ञरु.७५,०००/-
साथरोग तज्ञरु.३५,०००/-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीरु.७५,०००/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एम.बी.बी.एस.
रु.६०,००० – रु.४०,०००
स्टाफ नर्स
(GNM)
(स्त्री)
रु.२०,०००/-
बहुउद्देशीय
आरोग्य सेवक
(पुरुष)
रु.१८,०००/-
VVCMC Recruitment Application Procedure / वसई विरार मनपा भरती अर्ज कसा भरावा : 
  • वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, एम.बी.बी.एस. या संवर्गातील उमेदवाराच्या थेट मुलाखती (Walk in Interview) दि.२४/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे आयोजित करण्यात आल्या आहेत
  • तसेच वैद्यकीय अधिकारी- बी.ए.एम.एस., स्टाफ नर्स (GNM) (स्त्री) व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन (Merit) पध्दतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल. तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्राच्या मूळप्रती व स्वक्षांकित सत्यप्रतींसह दि. २४/०७/२०२४ ते दि.३१/०७/२०२४ रोजीपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू.) येथे प्रत्यक्षात (By Hand) किंवा टपालाने/कुरीयरने सादर करण्यात यावेत.
  • अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिला आहे.
VVCMC Recruitment Last Date / वसई विरार मनपा भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

31/07/2024

महत्वाच्या लिंक :

VVCMC अधिसूचना जाहिरात 

इतर सूचना : 
  1. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  2. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  3. जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमूद करावे.
  4. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  5. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अर्जात उल्लेख केलेला ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  6. उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
  7. अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरुपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.