माझी नोकरी : मुंबईच्या माझगाव डॉक कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | MDL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय, विभाग अंतर्गत सरकारी अनुसूची ‘A’ PSUs असून  संरक्षण उत्पादन, प्रामुख्याने युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याचे काम करते.

माझगाव डॉक कंपनीत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
जनरल मॅनेजर – टेक्निकल1
डेप्युटी जनरल मॅनेजर – फायनान्स1
सिनियर मॅनेजर – HR2
सिनियर मॅनेजर – फायर2
डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी1
मॅनेजर – राजभाषा1
डेप्युटी मॅनेजर – टेक्निकल3
असिस्टंट मॅनेजर – टेक्निकल10
सिनियर इंजिनियर – टेक्निक8

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर – टेक्निकलनामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवी

किंवा

नावल आर्किटेक्चर मधे पदवी

डेप्युटी जनरल मॅनेजर – फायनान्सCA / CWA

किंवा

नामांकित विद्यापीठातून ६० % गुणांसह MBA (फायनान्स) / MMS (फायनान्स)  पदवी.

किंवा

मॅनेजमेंट (फायनान्स) मधे पोस्ट ग्रॅ्युएट / डिप्लोमा

सिनियर मॅनेजर – HRनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवी / डिप्लोमा

आणि

जाहिरातीमध्ये दिलेला कोणताही HR संबंधित कोर्स

सिनियर मॅनेजर – फायरइन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स (इंडिया) मधून पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर.
आणि
नॅशनल सर्व्हिस कॉलेज, नागपूर मधून सब-ऑफिसर/स्टेशन ऑफिसर कोर्स पूर्ण केलेला असावा.
डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरीICSI ची अंतिम परीक्षा पास आणि ICSI चा सभासद
मॅनेजर – राजभाषाहिंदी किंवा संस्कृत मधे इंग्रजी विषयासह पदव्युत्तर (Masters) पदवी
डेप्युटी मॅनेजर – टेक्निकलनामांकित विद्यापीठातून कॉम्प्युटर / कॉम्प्युटर सायन्स / IT / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / सायबर सिक्युरिटी शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवी
असिस्टंट मॅनेजर – टेक्निकलनामांकित विद्यापीठातून कॉम्प्युटर / कॉम्प्युटर सायन्स / IT / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवी
सिनियर इंजिनियर – टेक्निकनामांकित विद्यापीठातून कॉम्प्युटर / कॉम्प्युटर सायन्स / IT / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / सायबर सिक्युरिटी शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवी आणि CISA/CISM/ SCISSP/ CEH/ Lead Auditor/ ECIH/ CHFI सर्टिफिकेशन

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 

पदाचे नाववयोमर्यादा
जनरल मॅनेजर – टेक्निकल54 वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर – फायनान्स50 वर्षे
सिनियर मॅनेजर – HR30 वर्षे
सिनियर मॅनेजर – फायर30 वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी50 वर्षे
मॅनेजर – राजभाषा42 वर्षे
डेप्युटी मॅनेजर – टेक्निकल38 वर्षे
असिस्टंट मॅनेजर – टेक्निकल34 वर्षे
सिनियर इंजिनियर – टेक्निक30 वर्षे

 

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग :  300/-
  • SC/ ST/ PWD : फी नाही

वेतन : 

पदाचे नाववेतन
जनरल मॅनेजर – टेक्निकल1,20,000-2,80,000
डेप्युटी जनरल मॅनेजर – फायनान्स90,000-2,40,000
सिनियर मॅनेजर – HR40,000-1,40,000
सिनियर मॅनेजर – फायर40,000-1,40,000
डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी90,000-2,40,000
मॅनेजर – राजभाषा70,000-2,00,000
डेप्युटी मॅनेजर – टेक्निकल60,000-1,80,000
असिस्टंट मॅनेजर – टेक्निकल50,000-1,60,000
सिनियर इंजिनियर – टेक्निक40,000-1,40,000

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास Create New Account  वर क्लिक करा आणि  रजिस्टर करा.
  • इच्छुक असलेले पद निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

माझगाव डॉक अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 3/4/2024

इतर सूचना :

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. पात्रता आवश्यकता/अनुभव आणि वयोमर्यादा 01 मार्च 24 रोजी मोजली जाईल.
  3.  पात्रता पदवीमध्ये जिथे जिथे सीजीपीए किंवा लेटर ग्रेड दिला जातो विद्यापीठ/संस्थेने स्वीकारलेल्या निकषांनुसार गुणांची समतुल्य टक्केवारी अर्जामध्ये दर्शवली जाणे आवश्यक आहे.
  4. गरज पडल्यास, MDL कोणतीही नोटीस जारी न करता किंवा कोणतेही कारण न देता भरती प्रक्रिया रद्द/बदल/प्रतिबंधित/विस्तारित/बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
  5. भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी जाहिरात केलेल्या सर्व रिक्त जागा अंशतः भरण्याचा किंवा संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार MDL राखून ठेवते.
  6. कोणत्याही वादाचे कायदेशीर अधिकार मुंबईत असतील

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.