टाटा मूलभूत संशोधन संस्थान (टीआयएफआर) ही भारतातील एक प्रमुख संशोधन संस्था आहे. तिची स्थापना १९४५ साली डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली झाली. ही संस्था मुंबईमध्ये स्थित असून ती विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चस्तरीय संशोधनासाठी प्रसिध्द आहे. टीआयएफआरमध्ये खगोलशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि संगणक विज्ञान यांसारख्या विविध विषयांमध्ये संशोधन केले जाते. संस्थेच्या वैज्ञानिक संशोधनामुळे भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचा वाटा उचलण्यात आला आहे.
TIFR मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
सायंटिफिक ऑफिसर (C) | 1 |
ज्युनिअर इंजिनिअर (B) | 1 |
क्लार्क (A) | 2 |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – फिटर | 1 |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक | 1 |
TIFR Recruitment Qualification / TIFR भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सायंटिफिक ऑफिसर (C) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह B.E पदवी आणि संबंधित कामाचा २-३ वर्षांचा अनुभव |
ज्युनिअर इंजिनिअर (B) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनियरिंग मधे डिप्लोमा आणि संबंधित कामाचा १-२ वर्षांचा अनुभव. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. |
क्लार्क (A) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधत आणि टायपिंगचे ज्ञान. संगणाचे ज्ञान असणे आवश्यक आणि त्यासंबंधीचे सर्टिफिकेट असणे आवश्यक. संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव. |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – फिटर | फिटर ट्रेड मधे ITI कोर्स पूर्ण किंवा NCVT द्वारा मान्य ॲप्रेंटीस सर्टिफिकेट असणे आवश्यक. |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक | संबंधित ट्रेड मधे ITI कोर्स पूर्ण किंवा NCVT द्वारा मान्य ॲप्रेंटीस सर्टिफिकेट असणे आवश्यक. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
TIFR Recruitment Selection Procedure / TIFR भरती निवड प्रक्रिया :
पदाचे नाव | निवड प्रक्रिया |
सायंटिफिक ऑफिसर (C) | मुलाखत |
ज्युनिअर इंजिनिअर (B) | मुलाखत |
क्लार्क (A) | लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – फिटर | लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक | लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट |
TIFR Recruitment Place of Work / TIFR भरती नोकरीचे ठिकाण :
टाटा मूलभूत संशोधन संस्थान (TIFR), मुंबई
TIFR Recruitment Age limit / TIFR भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सायंटिफिक ऑफिसर (C) | 28 वर्षे |
ज्युनिअर इंजिनिअर (B) | 28 वर्षे |
क्लार्क (A) | 38 वर्षे |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – फिटर | 28 वर्षे |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक | 28 वर्षे |
TIFR Recruitment Application fee / TIFR भरती अर्ज फी :
फी नाही
TIFR Recruitment Salary / TIFR भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
सायंटिफिक ऑफिसर (C) | 1,10,097/- |
ज्युनिअर इंजिनिअर (B) | 68.058/- |
क्लार्क (A) | 43,809/- |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – फिटर | 39,500/- |
प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (B) – रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक | 39,500/- |
TIFR Recruitment Application Procedure / TIFR भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन इच्छुक पदासामोरील Login/ Apply Online वर क्लिक करा
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
TIFR Recruitment Last Date / TIFR भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
२४ ऑगस्ट २०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- वरील सर्व पदे TIFR, कुलाबा, मुंबई येथे उपलब्ध आहेत.
- वरील सर्व पदांसाठी निवडलेले उमेदवार आवश्यक असल्यास, संस्थेच्या इतर केंद्रे/फील्ड स्टेशनवर हस्तांतरित करण्यास जबाबदार आहेत.
- 1 ते 4 क्रमांकावरील पदासाठी पात्र उमेदवारांसाठी उच्च प्रारंभिक पगाराचा विचार केला जाऊ शकतो.
- 5 आणि 6 क्रमांकावरील पदांसाठीची नियुक्ती तात्पुरती आहे आणि कामगिरीवर अवलंबून प्रत्येक वर्षी एकूण तीन वर्षांच्या कालावधीपर्यंत त्यांचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
- वरील सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना संस्थेच्या आवश्यकतेनुसार शनिवार/रविवार आणि सुट्टीच्या दिवशी काम करावे लागेल.
- वरील पदांसाठी विहित वय 01 जुलै 2024 पेक्षा जास्त नसावे. नियमानुसार वयात सूट.
- अनुक्रमांक 1 ते 4 मधील पदासाठी निवडलेले उमेदवार राष्ट्रीय पेन्शन प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातील [जोपर्यंत आधीच CCS (पेन्शन) नियम 1972 द्वारे शासित नसेल].
- सामान्य श्रेणीसाठी पदे (अनारिक्षित) – SC/ST/OBC/EWS/PwBD उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
- वय शिथिलतेच्या समर्थनार्थ प्रमाणपत्राच्या छायाप्रतीशिवाय अपूर्ण अर्ज (ऑनलाइन) आणि ऑफलाइन अर्ज आणि शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.